मंगळवेढा टाईम्स न्युज ।
माझ्या शिक्षकी पेशीच्या काळात अनेक चांगले विद्यार्थी मी घडवण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणाचा उपयोग करून राज्य पातळीवर आपल्या गावाचे नाव उज्वल केल्याचे गौरवोद्गार धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.
पुणे येथील सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब पाटील यांची पदोन्नतीवर अधीक्षक अभियंता म्हणून अमरावती येथे बदली झाल्याबद्दल मंगळवेढा येथे तळसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील,ज्येष्ठ नेते युन्नुश शेख, संचालक औदुंबर वाडदेकर, राजेंद्र चरण पाटील, बसवराज पाटील, भारत पाटील, मंडल अधिकारी ज्ञानेश्वर कोळी, मुख्याध्यापक गुरूनाथ बुगडे, प्रदीप पाटील, दुशासन दुधाळ, नानासो मेटकरी, स्वीय सहाय्यक सतीश पाटील आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.काळुंगे म्हणाले की, तालुक्यातील तळसंगी येथील रावसाहेब पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा नसताना देखील चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांचे नाव कमवायचे या उद्देशाने गाव सोडले मंगळवेढा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुढे त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले.

शासनाकडे अभियंता म्हणून नोकरी मिळवले त्या ठिकाणी मंगळवेढ्याचा सुपुत्र म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. तो माझा विद्यार्थी म्हणून मला त्याचा अभिमान वाटला आहे.

यावेळी बोलताना दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात शैक्षणिक दर्जा वाढल्यामुळे अनेक जणांचा कल उच्चशिक्षणाकडे वाढला आहे, वैद्यकीय संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्यातून ते यशस्वी होत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











