mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत परीक्षेद्वारे अधिकारी होण्याची संधी; तीन वर्षांनंतर बंदीचा निर्णय मागे घेतला; कोण देऊ शकेल परीक्षा, काय आहे पात्रता?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 3, 2025
in राज्य
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।

पोलिस कर्मचाऱ्यांना आता विभागीय परीक्षेतून पुन्हा पोलिस उपनिरीक्षक होता येणार आहे. परीक्षा न घेण्याचा निर्णय तीन वर्षांनी शासनाने मागे घेतला आहे. आता पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) होण्यासाठी २५ टक्के जागा राखीव असणार आहेत.

पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षकपर्यंतच्या पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा देऊन थेट पोलिस उपनिरीक्षक होण्याची संधी मिळत होती.

यासाठी २५ टक्के जागाही राखीव ठेवण्यात येत होत्या. मात्र, २०२२ मध्ये सरकारने खात्यांतर्गत स्पर्धा परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या ऐवजी सरळ सेवा आणि पदोन्नती अशा दोनच प्रकारांत पोलिस उपनिरीक्षक होण्याची संधी दिली गेली होती.

प्रत्येक पोलिस कर्मचारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक होईल अशी तरतूद केली होती. त्याला ग्रेड पीएसआय असे नाव दिले होते. दरम्यान, ही विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांमधून होत होती.

याबाबत ३ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिस महासंचालकांनी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. आता पुन्हा पूर्वीप्रमाणे विभागीय परीक्षा देऊन पोलिस कर्मचाऱ्यांना थेट पोलिस उपनिरीक्षक होता येणार आहे.

असा असेल कोटा

पोलिस उपनिरीक्षकांच्या ५० टक्के जागा या सरळ सेवा भरतीतून भरल्या जातील. २५ टक्के जागा या पदोन्नतीतून भरल्या जाणार आहेत. उर्वरित २५ टक्के जागा या विभागीय स्पर्धा परीक्षेतून भरण्यात येणार आहेत. पूर्वीचेच सूत्र पुन्हा लागू करण्यात आले आहे.

कोण देऊ शकेल परीक्षा, काय आहे पात्रता ?

पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक हे परीक्षा देऊ शकतील. परीक्षेच्या वर्षी उमेदवाराचे वय ३५ वर्षे असावे. मागास प्रवर्गासाठी ५ वर्षे वयात सूट.

उमेदवाराविरोधात कुठलीही विभागीय चौकशी, फौजदार कारवाई नसावी. उमेदवार १० वी उत्तीर्ण असेल तर त्याची सेवा ६ वर्षे अखंडित हवी. १२ वी उत्तीर्ण असेल तर ५ वर्षे व पदवी उत्तीर्ण असेल तर ४ वर्षे अखंडित सेवा आवश्यक आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाराष्ट्र पोलीस

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण.., मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत थेट सांगितलं…

December 15, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 15, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मित्रानेच मित्राचा विश्वासघात केला! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा; धक्कादायक प्रकार उघड

December 14, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर; ‘ही’ आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

December 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

December 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षण! राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्याने घेतला आक्षेप; आता सुनावणी ‘या’ तारखेपर्यंत तहकूब

December 12, 2025
आरटीओ चा दंड आता ई-चलनाद्वारे भरता येणार; आता दंड भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

आता चिरी-मिरी देऊन सुटता येणार नाही, वाहतूक पोलिसांना ‘हा’ कॅमेरा लावला जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

December 11, 2025
Next Post
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मोदी सरकारची सणासुदीच्या काळात मोठी भेट, जीएसटीत बदल केल्याने 'या' वस्तू होणार स्वस्त; आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! नगरपालिकेनंतर ‘या’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

December 15, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक दाबला, कंटेनरचा तोल जाऊन तो दुचाकीवर झाला पलटी; निवृत्त पोस्टमास्तरचा तडफडून मृत्यू; मंगळवेढ्यातील घटनेनं परिसरात हळहळ

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! मंगळवेढ्यातील जि.प. प्रशालेतील शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली; काय आहे प्रकरण?

December 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण.., मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत थेट सांगितलं…

December 15, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी; ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 15, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालक आक्रमक! शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णतः ठप्प; उद्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; मंगळवेढ्यात शिक्षण विभागाचे नेमके काय चाललंय; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु

December 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा