mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वारं फिरलं! पुढचे 48 तास ‘या’ 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; महाराष्ट्रावर मोठं संकट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 13, 2025
in राज्य
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरात अजूनही उकाडा आहे. पश्चिम महाराष्ट्र, तळ कोकण आणि विदर्भात अचानक 12 तासांत वारं फिरलं आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.

तर तळ कोकणात पावसानं पहाटेपासून बरसायला सुरुवात केली आहे. तळ कोकणातला पाऊस आता जोर धरणार असून पुढचे 48 तास तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. विकेण्डला वातावरण बदलणार असून मान्सूनचे वारे पुन्हा वेगानं सक्रिय होणार आहेत.

मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपट्टणम, पुरी, सँड हेड्स बेट आणि बालूरघाट येथून जात आहे. पुढील 48 तासांत मध्य आणि लगतच्या पूर्व भारतातील काही आणखी भागांमध्ये, विशेषतः विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.

13 जूनपासून 17 जूनपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा कोकणात देण्यात आला आहे. पूर्व भारतात पुढील २४ तासांत कोणताही बदल नाही, त्यानंतर ४ दिवसांसाठी २-३°C घट होईल.

आता बॅगेत छत्री, रेनकोट न विसरता ठेवा, कारण मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. 13 जून रोजी मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ही परिस्थिती उद्या, 14 जून रोजी आणखी तीव्र होऊन काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 15 आणि 16 जून रोजीही हीच स्थिती कायम राहील, त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज आणि उद्या (13 व 14 जून) रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह, 50–60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. 15 जून रोजी काही ठिकाणी, तर 16 जून रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

रायगडसह रत्नागिरी, सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे आणि नदीकिनारी राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पावसात शेतकरी

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
Next Post
अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

अर्थकारण! मंगळवेढ्यातील 'AD फायनान्स'चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा