mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! आयुष्य उद्ध्वस्त करेन, जीव घेण्याची धमकी, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब; पती हरवल्याची पत्नीची तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 11, 2025
in क्राईम, राज्य
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत.

केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून, या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत लिहिलेल आहे. मात्र, या संदर्भात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे. माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.

या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली आहे.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा ही दिला आहे.

या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, केमदारणे नेमके बेपत्ता का झाले? त्यांच्या बेपत्ता होण्यामागे इतर काही कारणं आहेत का? खरंच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती का? आणि कशासाठी दिली असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

केमदारणे इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. मात्र, 27 एप्रिल रोजी त्यांचा इंदापूर पोलीस ठाण्याकडील पदभार काढण्यात आला होता. भिगवण पोलीस ठाण्याकडे त्यांना रुजू होण्यासाठी कळवण्यात आलं होतं. मात्र केमदारणे यांनी भिगवन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला नव्हता.

इंदापूर पोलीस ठाण्यात केमदारणे यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. आमची प्राथमिकता ही सध्या केमदारणे यांना शोधणे ही आहे. त्यासाठी पथकं तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सुरु आहे.

त्यांनी चिठ्ठीत काही अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत, त्या अनुशंगाने त्याची चौकशीही केली जात आहे. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस हवालदार बेपत्ता

संबंधित बातम्या

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 24, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

माणुसकीला कलंक! दिव्यांग भावाची थट्टा करणाऱ्यांना जाब विचारला म्हणून १८ वर्षीय सुजितची निर्घृण हत्या; मंगळवेढा हादरले

April 23, 2026
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास

April 22, 2026
Next Post

आदेश धडकला! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मोठी बातमी; प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश

ताज्या बातम्या

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 24, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

पाणीदार सरपंच! स्वखर्चातून विहीर खोदून सरपंचांनी भागविली संपूर्ण गावाची तहान; शासकीय निधीची वाट न पाहता मंगळवेढ्याच्या ‘या’ गावच्या सरपंचांचा आदर्श

April 24, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

माणुसकीला कलंक! दिव्यांग भावाची थट्टा करणाऱ्यांना जाब विचारला म्हणून १८ वर्षीय सुजितची निर्घृण हत्या; मंगळवेढा हादरले

April 23, 2026
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा