मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधूला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना बाभूळगाव (ता. माळशिरस) येथे पराडे-गळगुंडे या परिवारात घडली.
समीर हरिदास पराडे यांचे १३ मे रोजी घोटी (ता. माढा) येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात पार पडला. लग्नानंतर नववधू सासरी आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने तत्काळ अकलूज येथील खासगी हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना प्रवासादरम्यान नववधूवर काळाने झडप घातली.
सासरच्या सुनेचा व माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्यूने दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला होता. मृत्यू झालेल्या जानकी हिच्यावर बाभूळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीला जावयासह स्वीकारले
हाताच्या फोडाप्रमाणे अठरा वर्षे सांभाळलेल्या मुली सज्ञान झाल्या की वेगळा मार्ग निवडतात. जीवापाड सांभाळलेली मुलगी पळून गेली की तिचे आई, वडील, भाऊ यांची काय अवस्था होते, हे समाजात वावरताना आपण पाहतो. प्रियकर व प्रेयसी दोघांनी पळून जाऊन ऑगस्टमध्ये आळंदीत लग्न केले.
मात्र, आठ महिन्यांनी वडिलांनी जावयासह स्वीकारले. ही घटना वैराग पोलिसांच्या समन्वयाच्या भूमिकेमुळे घडली. वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एका कुटुंबातील सज्ञान मूलगी अचानक घरातून गायब झाली.
महिन्यांपूर्वी जाऊन पळून आळंदी येथे लग्न केले होते.
तिच्या वडिलांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी मुलगी हरवल्याची तक्रार वैराग पोलिसात दिली. पोलिस कसून शोध घेत होते. ती त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या एका गावातील युवकाबरोबर पळून गेल्याची माहिती मिळाली. मुलीने व युवकाने ११ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी येथे विवाह केला. दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांचे व तिच्या वडिलांचे काहीच चालेना.
शेवटी वैराग पोलिसांनी मुलीचे वडील त्यांची मुलगी आणि जावई यांच्यात असलेला दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (दि. १३) या सर्वांची वैराग पोलिस ठाण्यात भेट घडवून आणली. मुलीच्या वडिलांनी पण मनाचा मोठेपणा दाखवत मुलीला जावयासह स्वीकारले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज