टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजना राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान सूर्यघर योजनेला मंगळवेढा तालुक्यासह सोलापुर जिल्ह्यात सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
साडेतीन हजारापेक्षा अधिक ग्राहकांनी स्वतः च्या घरावर सोलर प्रकल्प कार्यान्वित करून वीज बिलापासून मुक्ती मिळविली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ८६७ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरू आहे. मागेल त्या शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानातून सौरपंप दिले जात आहेत. तर घरगुती ग्राहकांसाठी सूर्यघर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
आकर्षक सवलत
स्पार्टन सोलरच्या माध्यमातून जे नागरीक दुकान, उद्योग, घरावर सोलर बसवतील त्यांना सबसिडीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 9890691178 या नंबरवर संपर्क साधून आजच सोलर बुक करून आकर्षक सवलत मिळवू शकता. असंख्य नागरिकांनी आपल्या घरावरती सोलर बसून याचा लाभ घेतला आहे.
सूर्यघर योजना घरगुती ग्राहकांना विजेच्या दृष्टीने स्वावलंबी करणारी असल्याचे महावितरणने सांगितले. सौर ऊर्जेच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे व शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरण सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.
काय आहे सूर्यघर योजना?
सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार तर ३ किलोवॅट किंवा त्यापुढील प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. या योजनेला अनेक राष्ट्रीयकृत बँकाही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो.
केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान सूर्यघर योजना राबविली जाते. वीज ग्राहकांकडून सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणकडून विविध उपक्रम, जनजागृती, प्रचार, प्रसारावर आधारित कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्राहकांनी वीजबिलापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येक आपापल्या घरावर विजेसाठी सोलर प्रकल्प बसवावा व शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभघ्यावा.-सुनील माने, अधीक्षक अभियंता,महावितरण
७ हजार १०१ अर्जाना मंजुरी
पीएम सूर्यघर योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २११ ग्राहकांनी घरावर सौरप्रकल्प उभारणीसाठी महावितरणकडे अर्ज केला आहे. त्यापैकी ७ हजार १०१ अर्जाना महावितरणने मंजुरी दिली आहे. त्यापैकी ३ हजार ४४२ घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज