mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संक्रांतवर संक्रात! वाल्मिक कराडला चोहोबाजूने ‘धस’का; कराडला अखेर मकोका; खूनाचा गुन्हा दाखल होणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2025
in क्राईम, राज्य
वाल्मीक कराड विरोधात १४० शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार; ऊस तोडणी यंत्रांना अनुदान मिळवून देण्यासाठी ११ कोटी २० लाख रुपये घेतल्याचा पंढरपूरच्या शेतकऱ्यांचा आरोप

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क

वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सीआयडी लिंक तपासणार?

वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहे. त्यामुळे संतोष देशमुख मर्डर प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का?

याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हत्येचा कट रचल्याचा आरोप

वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, असं एसआयटीने कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्ट का निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे?

आज केवळ खंडणी प्रकरणात दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. कुठे ही तपासात वाल्मिक कराड यांचा कुठलाही सहभाग नाही असा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यांच्यावर मकोका लावण्याचा कोणताही युक्तीवाद झाला नसल्याची माहिती ॲड ठोंबरे यांनी दिली.

आज कोर्टापुढे युक्तीवाद झाला. त्यांनी १० मुद्द्यावर पोलीस कोठडी मागितली. दहा दिवसाची कोठडी मागितली होती. त्या आधीच्या वेळीही पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयीन कोठडी लावण्यात आली आहे. मकोका लावण्यात आल्याचं आमच्यासमोर काही आलं नाही.

आज फक्त खंडणीचं प्रकरण होतं. मकोकाचा अर्ज आलेला नाही. आम्ही पुढच्यावेळी सांगू. आतापर्यंत तपास आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. गुन्ह्यता कराड याचा सहभाग दिसून आला नाही. पोलिसांनी परत दहा दिवसाचा कोठडी मागितली.

आम्ही जामिनाचा अर्ज केला आहे. दोन चार दिवसात सुनावणी होणार आहे. मकोकाची प्रक्रिया वेगळी आहे. सरकारी वकिलाचे नवीन मुद्दे काही नव्हते. त्यांनी कुठे कुठे मालमत्ता घेतली, ॲट्रोसिटी वगैरे मुद्दे मांडले. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. पण कोर्टाने सर्व मुद्दे ग्राह्य धरले नाही, असे ॲड. ठोंबरे यांनी सांगितले.

परळी बंदची हाक

वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहे. त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे.

आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडवे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत.(स्रोत:TV9मराठी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोकोकावाल्मिकी कराड

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
Next Post
गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! सिध्दापुर नदीपात्रातील स्वयंभू मातृलिंग गणपती अंगारकी चतुर्थीनिमित्ताने दर्शनासाठी खुला

भाविकांनो! सिध्दापुर येथे आजपासून स्वयंभू मातुर्लिंग गणपती यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची मांदियाळी; मंगळवेढ्यातून जादा बसेसची व्यवस्था

ताज्या बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा