मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा आज बुधवारी (दि. १५) होत आहे.
पहाटे सहा वाजता श्रींची महापूजा आमदार समाधान आवताडे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रणिती शिंदे – उपस्थित राहणार आहेत.
यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिली.
मातृलिंगदेवस्थान हे भीमा नदीच्या पात्रात प्रगट झालेली गणपतीची स्वयंभू मूर्ती असून नवसाला पावणारा बाळ गणपतीम्हणून प्रसिद्ध आहे. तो तीन पाण्याच्या घारेच्या मध्यावर वसलेला आहे.
सिद्धापूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या पात्रात स्वयंभू गणपतीची मूर्तीचे मंदिर आहे. सध्या भीमा नदीला पात्रात पाणी आसल्यामुळे देवस्थानपासून नदीपात्रात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे पात्रालगत दर्शनासाठी उत्सव मूर्ती ठेवण्यात येणार आहे.
ग्रापंचायतीकडून गेल्या तीन वर्षांपासून यात्रेत येणाऱ्या व्यापारी, फेरीवाल्यांकडून जागाभाडेपट्टी घेण्यात येत नाही. यात्राकालावधीत मंगळवेढापासून सिद्धापूर व माचणूर ते सिद्धापूर एसटी बसची सुविधा भाविकांना दिवसभर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यात्रे दिवशी बुधवारी उत्सव मूर्ती गावातून वाजत गाजत यात्रास्थळावर मार्गस्थ होते. सांगली संस्थानकडून भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे व दिगंबर गेजगे यांनी बंदोबस्त ठेवला आहे.
पालखीसमोर आतषबाजी, रात्री कन्नड नाटक होणार
बुधवारी सायंकाळी पालखीसमोर अतषबाजी करण्यात येणार आहे. रात्री कन्नड सामाजिक नाटक मगा तंद मांगल्या अर्थात छल साधीसिद चतुरचे सादरीकरण ट्रस्टच्या वतीने होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज