mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा पाय खोलात, ‘इतक्या’ दिवसाची पोलीस कोठडी; कोर्टात काय काय घडलं?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 1, 2025
in क्राईम, राज्य
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला.

यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात आज रात्री उशिरा हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली.

यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत.

मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

रात्री 10 वाजेनंतर केजच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे. सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारी वकील युक्तिवाद

हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे.

कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण आहे.

हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे तपासायचे आहे.

मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का हे तपासायचं आहे.

तपासासाठी कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या

संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का? हे तपासायचं आहे.

सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा.

वाल्मिक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे.

काम बंद करू, हातपाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेने दिली होती

कराडचे वकील अशोक कवडे यांचा युक्तिवाद

फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे

कराडा हा गरीब सामाजिक कार्यकर्ता आहे

कराडांना या प्रकरणात जाणूबुजून अडकवलं जात आहे.

राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न

2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, त्यातील किती पैसे दिले हे साांगा

2 कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे

2 कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे

आवाजाचे नमूने द्यायला तयार आहोत, पण कोठडी नको

कराड सरेंडर झाले, आता जामीन द्या

मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ नये

कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी

सर्व पेपर तुमच्याकडे आहे, तुम्ही तपास करा. 308 हे कलम चुकीच्या पद्धतीने लावलं जात आहे.

कोर्टाबाहेर दमदाटी

सीआयडी पथक आणि बीड पोलीस आरोपी वाल्मिक कराडला घेऊन केजमध्ये दाखल होत नाही त्याआधीच केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी जमलेली होती. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आणि त्याच्या विरोधकांनी केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली.

विशेष म्हणजे केज कोर्ट परिसरात त्याआधी वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातील वाहनं बाहेर काढण्यावरुन कोर्ट कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकारही समोर आला होता. यानंतर थोड्या वेळाने सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडचे समर्थक आणि विरोधकांनी केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली.

केज कोर्ट परिसरात पोलिसांचा लाठीचार्ज

वाल्मिक कराड हा केज कोर्ट परिसरात सुनावणीसाठी दाखल झाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली. त्यामुळे वाल्मिक कराड कोर्ट परिसरात दाखल होण्याआधी पोलिसांनी केज कोर्ट परिसरात जमलेल्या गर्दीला हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सर्व गर्दी दूर बाजूला सारण्यात आली. त्यानंतर थोड्या वेळाने वाल्मिक कराडला तिथे आणण्यात आलं.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वाल्मिकी कराड

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post
मोठा दिलासा ! भारतात कोरोनाची पहिली लस विकसित ; मनुष्यावर परिक्षण घेण्यास मिळाली मंजूरी

मधुमेहींसाठी खूशखबर! आता भातही खाता येईल बिनधास्त; 'या' कृषी विद्यापीठाने भाताची नवी जात शोधली; राष्ट्रीयस्तरावर चाचणी

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा