मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मधुमेह झाल्यानंतर गोड गोष्टी टाळण्याबरोबरच भात खाण्यावरही बंधन येते. मात्र, ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असलेली भाताची नवी जात (वाण) शोधण्यात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राला यश आले आहे.
ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी आणि प्रोटीन्सचे भरपूर प्रमाण या भातामध्ये असल्याने आता मधुमेहींना बिनधास्त हा भात खाता येईल.
शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या विविध जातींचे संशोधन केले आहे. त्यातून ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असणारे वाण तयार करण्यात यश आले आहे.
जैवसंपृक्त वाण
कॅल्शिअम, लोह, झिंक हे घटक भातातून उपलब्ध झाले तर त्यासाठीच्या गोळ्या टाळता येतील. नवीन वाणामध्ये हे घटक असल्यामुळे त्याला जैवसंपृक्त वाण म्हणूनही संबोधले जाणार आहे. नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त भाताचे वाण हा उत्तम पर्याय ठरणार आहे.
भातातून प्रथिनेही
नवीन संशोधित वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ ते १० टक्के असेल. डाळींच्या वाढत्या दरापेक्षा मुबलक प्रथिने असणारे भाताचे वाण तयार करण्यात यश आले आहे.
राष्ट्रीयस्तरावर चाचणी
सध्या या भाताची स्थानिक पातळीवर चाचणी सुरू आहे. लवकरच राज्य व राष्ट्रीयस्तरावर चाचणीसाठी देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना येत्या दोन वर्षांत हे नवे वाण उपलब्ध होईल.
भरपूर जीवनसत्त्व व पोषक घटक
हा भात रुग्णांसाठी उपयुक्त आहे. मात्र, लाल रंग असल्याने त्याबाबत नाक मुरडले जाते. यावर पर्याय म्हणून कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून भरपूर जीवनसत्त्व व पोषक घटक असलेला;
परंतु रंगाने पांढरा असलेल्या भाताचे संशोधन करण्यात आले आहे. राष्ट्रीयस्तरावर चाचणीनंतर ते प्रसारित केले जाणार आहे.-डॉ. विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव..(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज