टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ. नंदा टेळे-मासाळ यांची संचालक मंडळाच्या बैठकीत अविरोध निवड करण्यात आली.
मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची जिव्हाळ्याची संस्था म्हणून या तालुका शिक्षक पतसंस्थेचा लौकिक असून 1987 पासून मागील 37 वर्षे अल्पदराने पतपुरवठा करुन शिक्षकांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक या संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे.
मंगळवेढा तालुक्यातील जवळपास पाचशेहून अधिक शिक्षक या संस्थेचे सभासद आहेत . निवडणूक निर्णय अधिकारी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत चेअरमन पदासाठी श्रीमती नंदा टेळे – मासाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी रावसाहेब सुर्यवंशी, धनंजय पाटील, निंगप्पा बिराजदार, अनिल दत्तू, पांडुरंग शिंदे, छत्रुघ्न माळी, सिद्धेश्वर सावत, काशिनाथ लिगाडे, बाळासाहेब कांबळे, दिलीप गडदे, संदीप धुमाळे, उमेश माळी इत्यादी उपस्थित होते.
या निवडी प्रसंगी संस्थेच्या व्हा.चेअरमन सुषमा सुतार, शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती कलुबर्मे , स्वाती सरडे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
मावळते चेअरमन विठ्ठलराव ताटे यांनी मागील वर्षभराच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली तर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी सर्व संचालक मंडळाला
सोबत घेऊन पारदर्शी व अधिक चांगल्या योजना राबवून सभासदाभिमुख कारभार करावा अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. शिवाय सेवानिवृत्त सचिव विठ्ठल खांडेकर यांचा देखील संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत पवार, सुर्यकांत जाधव, अशोक इंगळे, विलास मासाळ, अरुण सरडे, सहसचिव तानाजी मिसाळ यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज