mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

क्षेत्र वाढले! सोलापुरी कांद्याचा पुढील ‘इतके’ महिने राहणार बाजारात दबदबा; खरीप हंगामात कांदा लागवडीत राज्यात सोलापूर अग्रेसर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 19, 2024
in सोलापूर
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कांदा लागवडीला वेग आला असून मागील आठवड्यापर्यंत राज्यात दीड लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. कांदा लागवडीत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

कांदा लागवडीत अहमदनगर व नाशिक दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहेत. खरीप व लेट खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्र सर्वाधिक असले तरी रब्बी हंगामात नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लागवड क्षेत्र वाढणार आहे.

जून-जुलै महिन्यात राज्यात केवळ सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड झाल्याने पुढील दोन महिने सोलापुरी कांद्याचा बाजारात दबदबा राहणार आहे.

ऊस, केळी, डाळिंब उत्पादनात सोलापूर जिल्हा सतत आघाडीवर असतोच; आता कांदा उत्पादनातही प्रथम राहतो की काय?, असे वाटू लागले आहे. यंदा लवकर जून महिन्यात पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती.

यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली. त्यामुळे खरीप पेरणीच्या क्षेत्रात दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे.

पेरणीनंतर पाऊसही चांगला पडत राहिल्याने पिके जोमात वाढली आहेत. केवळ सोयाबीनची पेरणी दीड लाख हेक्टरपर्यंत क्षेत्रावर झाली आहे.

तूर जवळपास एक लाख तर उडीद एक लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरल्याची कृषी खात्याकडे नोंद झाली आहे. कधी नव्हे इतक्या ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी केली असल्याचे दिसत आहे. खरीप हंगामातील पिकांसोबत यंदा

कांद्याची पेरणीही जिल्हाभर झाली आहे. १५ ऑगस्टपर्यंत कांदा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या १५-२० दिवसांपासून कांद्याची पेरणी व लागवड केली जात आहे. सगळीकडे कांद्याची लागवड सुरू असल्याचे दिसत आहे.

राज्यभरात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड व पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा प्रथम, अहमदनगर द्वितीय व नाशिक जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती लागवड

सोलापूर जिल्ह्यात ३७ हजार हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात ३३ हजार हेक्टर, नाशिक जिल्ह्यात २९ हजार ५०० हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात १५ हजार ६०९ हेक्टर, पुणे जिल्ह्यात ८ हजार हेक्टर, धुळे ७ हजार हेक्टर, बीड सहा हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगर साडेचार हजार हेक्टर, साताऱ्यात साडेतीन हजार हेक्टर तर जळगाव जिल्ह्यात बाराशे हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे.

सर्वाधिक कांदा

जून व जुलै महिन्यात राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड झाल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील कांद्याचा बाजारात दबदबा राहणार आहे.(स्रोत:लोकमत)

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी कांदा

संबंधित बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
Next Post
सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करून उद्योजक तयार करण्यासाठी नितीन इंगोले व माणगंगा परिवार यांनी एक पाऊल पुढे टाकले; आ.शहाजीबापू पाटील यांचे गौरवोद्गार

सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करून उद्योजक तयार करण्यासाठी नितीन इंगोले व माणगंगा परिवार यांनी एक पाऊल पुढे टाकले; आ.शहाजीबापू पाटील यांचे गौरवोद्गार

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा