टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सूरू होता. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झालेले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस ७२ तासात कळवावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ या हंगामाकरीता अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकांसाठी राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यासाठी खरीप २०२४ मध्ये ओरियंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे.
नुकसानीबाबत सुचना पीकविमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पीकविमा अॅप अथवा कृषि रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक १४४४७ या क्रमांकाचा वापर करावा.
तसेच या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, बँक कृषी व महसुल विभाग यांना द्यावी, असे आवाहनही गावसाने यांनी केले आहे.
जिल्ह्यातील १२ हजार ९३२ शेतकरी केवायसी, आधार लिंक नसल्याने सन्मान निधीपासून वंचित
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपयांची पेन्शन दिली जात आहे. आधार प्रमाणिकरण, ई-केवायसी आणि लॅण्ड सिडींग नसल्याने जिल्ह्यातील १२ हजार ९३२ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
वंचित शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रांवर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार ५५० शेतकऱ्यांना किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळाला आहे.
त्यातून त्या शेतकऱ्यांना तब्बल ९६.९१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ई-केवायसी नसलेले ५३२३, आधार सिडींग नसलेले ६२९२ आणि जमिनी सिडींग नसलेले १३१७ असे एकूण १२९३२ शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तर १९ हजार ४०६ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नव्याने नोंदणी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज