टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापुरात पेट्रोल पंप चालविणाऱ्या एका सिगोरट कारखानदाराच्या घरी व पंपावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तीन दिवसांपूर्वी धाड टाकली असून,
सिगारेट कंपनीतील कोट्यवधीचा पैसा हवाला मार्फत दुबईतील एजंटांकडे फिरविल्याचा संशय ईडीला आहे.
बुधवार, ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील ईडीच्या सिगारेट कंपनीच्या मालकाला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली असल्याचे वृत्त आज लोकमतने प्रसिध्द केले आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया जैसमीत हकीमजादा याच्याविरोधात ईडीने देशभरात दहा ठिकाणी छापे टाकले आहेत. याच प्रकरणात सोलापुरात धाड पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कारवाई दरम्यान कंपनीचे मालक सोलापुरात नव्हते. विदेशातून ते सोलापुरात परतले आहेत. सध्या ते वकिलांच्या संपर्कात असून, ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी कायदेशीर बाबींची पडताळणी करत असल्याची माहितीही देण्यात आली.
पाच ते सहा कोटींची उलाढाल
सिगारेट व्यावसायिकाचे शहरात एक पेट्रोल पंप आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर, तसेच कंपनी संबंधित ‘सीए’च्या कार्यालयाचीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
पेट्रोल पंपावर दिवसभर ईडीची गाडी उभी होती. ‘सीए’च्या कार्यालयातील, तसेच पेट्रोल पंप संबंधित व्यवहारातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीच्या या कारवाईत पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता.
पीएम पोर्टलवर तक्रार
मागील वर्षभरापासून सिगारेट कंपनी बंद आहे. व्यवसाय नुकसानीत चाललाय, त्यामुळे कंपनी बंद केल्याचे ते सर्वांना सांगायचे. कारखान्यातील सर्व साहित्याची विक्रीही त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी याच कंपनीविरोधात पीएम पोर्टलवर तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर जीएसटी विभागाने कंपनीची चौकशी केली. तक्रारीनुसार चौकशीत कागदपत्रे न सापडल्याने पुढे कार्यवाही झाली नाही.(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज