टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील गाजत असलेले बालाजी नगर येथील समाज मंदिर 1981 सालापासून कोणाचीही परवानगी न घेता त्यात खाजगी पतसंस्था चालवत होती त्याचा फायदा ग्रामपंचायतला काहीही नाही व नागरिकांना ही नाही
त्यामुळे प्रहारच्या आंदोलनामुळे गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली पण मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दामाजी चौकातील मुरूम चोरावर कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे प्रहारणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.
बालाजी नगर मधील माजी सरपंचाचा संसार बाहेर काढून विद्यार्थ्यांना वाचनालय खुले केले आहे त्यामुळे लमानतांडा येथे विद्यार्थ्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे व त्याबरोबर प्रहार चे आभार ही मानले आहे.
पण कृष्ण तलावावरील सुशोभिकरणाचे काम चुकीचे झाले आहे त्याचे उत्तर दिले नाही ,बोगस डॉक्टर हा पोलीस पाटील पदावरती आहे त्याची हकालपट्टी केली नाही त्यामुळे प्रहार ने आंदोलन सुरूच ठेवले आहे हे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे.
या आंदोलनात प्रहार चे सिदराया माळी ,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील ,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय राठोड, धनंजय माने,
शहराध्यक्ष युवराज टेकाळे, तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक ,सुधीर हजारे, अनिल धोडमिसे ,अजय राठोड, आकाश राठोड ,गोटु पवार, रणजित अडसूळ, शुभम लेंडवे, हर्षल जाधव
यांनी सुट्टीच्या दिवशी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. यावेळी आंदोलन करते सिदराया माळी यांनी जोपर्यंत मुरूम चोर व बोगस डॉक्टर वर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रहारचे आंदोलन सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका घेतली आहे
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज