टीम मंगळवेढा टाईम्स ।
लाडकी बहीण, भाऊनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवास ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं हे महायुती सरकारचं काम आहे.
आम्ही पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम करीत आहोत. आमच्या सरकारचं धोरण कष्टकरी, वारकरी, शेतकरी सुखी हेच आहे. त्यामुळे आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत.
सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं.
या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आलीयं. त्यामुळे आता या योजनेचीही राज्यभरात चांगलीच चर्चा होईल.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज