टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रशिक्षणार्थी ‘आयपीएस’ अधिकारी म्हणून मी सोलापुरात यापूर्वी काम केले आहे. ग्रामीण भागाची माहिती आहे, सध्या सायबर गुन्हे वाढत आहेत. महिलांसह सर्वसामान्य लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी सायबर गुन्ह्यांवर आळा कसा घालता येईल यावर भर देणार आहे.
जिल्ह्यातील बेकायदा वाळूसह अवैध व्यवसायाबाबत पथके नेमणार असल्याची माहिती नूतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सायबर गुन्ह्यांबाबत महिलांना माहिती नसते, त्यामुळे त्या मोबाइलवर आलेला ओटीपी शेअर करतात. फसवणूक करणाऱ्या फोनला प्रतिसाद देऊन माहिती देतात, यातून महिलांच्या बँक खात्यातील पैसे जातात.
सर्वसामान्य लोकही मोठ्या प्रमाणात फसत आहेत. याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर असणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची चांगली माहिती आहे.
अवैध व्यवसायांवर कारवाया केल्या जातील. बेकायदा वाळू उपसा प्रकरणीही लक्ष ठेवले जाईल. ११ तालुक्यांमध्ये असलेल्या २५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके तयार करणार असून, मोहीम राबवली जाईल. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणणार आहे.
चोरी, दरोड्यासह विविध प्रकारच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातील. सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासणार असून सध्याची स्थिती काय आहे? याची माहिती घेणार. मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारूबाबतही अभियान राबवणार असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
शेतकरी प्रेरणा अभियान राबविणणार
ग्रामीण भागात भावकीच्या जमिनीचा वाद, शेताच्या बांधाचा वाद यातून अनेक गुन्हे घडतात. हे गुन्हे कमी झाले पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांच्या भेटीही घेण्याचे नियोजन आहे. शिवाय शेतकरी प्रेरणा अभियान राबिवणार आहे. शेतकरी प्रेरणा अभियान राबविण्याचा मानस असल्याचेही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज