टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराबाहेर आता ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच घेरायलासुरवात केली आहे अशा स्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेयांनी केवळ शहरावरच लक्ष केंद्रित केले आहे त्यांनी पदभार घेतल्यापासून मंगळवेढा तालुक्यात भेट दिली नसून कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी पालकमंत्र्यांनी मंगळवेढा तालुक्यात बैठक घेण्याची मागणी होत आहे.दरम्यान आजपर्यंत च्या तीन पालकमंत्र्यांनी नियुक्तीनंतर एकाही भेट न देता पाठ फिरवली आहे. The Guardian Minister of Solapur district focuses only on the city; Rural areas in the wind
शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे अशा स्थितीत पूर्वीचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शहराला भेट देऊन कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती अशा स्थितीत त्यांच्या जागी पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक झाली त्यांनाही पदभार घेतल्यानंतर काही दिवसात कोरोनाची लागण झाली.तसेच त्यांना सोलापूर च्या पालकमंत्रीपदी जास्त रस नव्हता त्यामुळे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्यत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय भरणेयाची नेमणूक करण्यात आली त्यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसात शहरात कोरोनाने आक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले त्यामुळे त्यांनी शहरावरच लक्ष केंद्रित करून विविध उपाययोजना केल्या वारंवार बैठका घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लावले.
त्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी ,मोहोळ दक्षिण सोलापूर येथील कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाला रोखण्यासाठी बैठका घेऊन अधिकाऱ्यांना योग्य ते दिशानिर्देश दिले नुकतेच माळशिरस येथे बैठक घेतली कोरोनामुक्त असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात आता कोरोनाने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे अशा स्थितीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवेढा तालुक्यात भेट देऊन बैठक घेतल्यास नागरिकांना दिलासा मिळेल तसेच आरोग्य विभागातील अडचणी जाणून त्यावर मार्ग निघेल मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघचे आमदार हे राष्ट्रवादी पक्षाचे असताना आजपर्यत झालेल्या तिनही राष्ट्रव्यादीच्या पालकमंत्र्यांनी एकदाही मंगळवेढा तालुक्याला भेट दिली नाही तरी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी व अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी भेट द्यावी अशी मागणी होत आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज