टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोनं हा अनेक माणसांच्या विशेष करुन महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. सोनं किंवा सोन्याचे दागिने आवडत नाहीत अशी व्यक्ती सापडणं तसं अवघड असतं. सोन्याचे दागिने हे श्रीमंतीचं लक्षण आहे.
ती हौस आहे आणि त्यावर तुमचं स्टेटस ठरतं. त्यामुळे अनेकांना सोनं खरेदी करण्यात रस असतो. सोन्याच्या दागिन्यांची आवड असो वा नसो, सोन्यात केलेली गुंतवणूक नेहमीच उत्तम रिटर्न्स देते.
त्यामुळेही अनेक जण जमेल तेव्हा जमेल तेवढं अगदी एक ग्रॅम का होईना, पण सोनं खरेदी करतात. लवकरच सोनं खरेदीसाठी ‘एक देश एक दर’ हे धोरण लागू होणार आहे. पूर्व भारतातून त्याची सुरुवात होईल.
सराफ उद्योगाकडून सध्या ‘एक देश एक दर’ या धोरणाचा पुरस्कार करण्यात येत आहे. त्याची सुरुवात ऑगस्ट महिन्यात पूर्व भारतात एक दर लागू करण्यापासून होणार आहे.
एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. सुवर्ण शिल्प बचाव समितीचे अध्यक्ष समर कुमार डे म्हणाले, सर्व संबंधितांनी देशात सोन्याचा एकच दर असावा, या विचाराशी सहमती दर्शवली आहे.
पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये ऑगस्टपासून ‘एक देश एक दर’ हे धोरण लागू करत आहोत. सराफ व्यावसायिकांनाही यात सहभागी करुन घेण्यात आलं आहे.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन संयम मेहरा म्हणाले, सर्वांना समान संधी मिळवून देणं आणि मूल्यऱ्हास रोखणं हा यामागील उद्देश आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या 2024-25 च्या बजेटमध्ये सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन सहा टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
तसं केल्यास अवैध आयात रोखण्यास मदत होईल असं मत सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. हिऱ्यांचे आयातकर्ते सनी ढोलकिया म्हणाले, एकूण 950 टन आयातीपैकी 100 टन सोन्याची तस्करी होते असा अंदाज आहे.
उद्योग जगतातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडे सोन्याशी संबंधित वस्तू आणि सेवा कराबाबत इतर योजना आहे का, हा चिंतेचा विषय आहे. जीएसटी परिषदेने दागिन्यांवरील कर तीन टक्क्यांवरुन एक टक्क्यावर आणावा अशी मागणी केली आहे. दरम्यान बजेटनंतरच्या तीन दिवसांत सोनं पाच हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते गुरुवारी चांदीचा दर 3388 रुपयांनी कमी झाला. चांदी प्रतिकिलो 81,474 रुपयांवर आली. 24 कॅरेट सोनं 924 रुपयांनी पडलं आणि 68,227 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढं झालं. बजेटनंतर गुरुवारपर्यंत तीन दिवसांत सोनं सुमारे 5000 रुपयांनी तर चांदी सुमारे 6000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.(स्रोत:News 18 लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज