टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील वाढवले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीत अनेकांचे रोजगार देखील बंद झाल्याने अनेक जण आत्महत्या करुन आयुष्य संपवत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली आहे. एका खाजगी सावकाराच्या तगादामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच घरातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी रात्री समोर आले आहे.
अमोल अशोक जगताप (वय 36), मयुरी अमोल जगताप (27), आदित्य अमोल जगताप (6) आणि आयुष अमोल जगताप (3, सर्व रा. हांडे प्लॉट, जुना पुणे नाका) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
हांडे प्लॉट येथे रजपूत यांच्या घरात जगताप कुटुंबीय भाड्याने राहत होते. अमोल जगताप हे बिअरबार चालवित असल्याचे समजते. त्यातच त्यांना कर्ज झाले होते. सावकारांकडून त्यांना सतत कर्जाची मागणी होत होती. त्यामुळे कंटाळून अमोल यांनी आपल्या दोन्ही चिमुकल्यांना प्रथम गळफास देऊन मारले, त्यानंतर पत्नी मयुरी व अमोल यांनी गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे.
त्या घरात एक चिठ्ठी सापडल्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबतीत गुन्हा दाखल झाला नव्हता. सर्व मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज