टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमधील मतदानादिवशी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची केंद्रिय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
मतदान काळात पत्रकार परिषद घेत आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, असे आदेश आता केंद्रिय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
मुंबईसह राज्यातील १३ लोकसभा मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान झाले. या मतदानादरम्यान मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.
यावरुनच उद्धव ठाकरे यांनी मतदान संपायला १ तास बाकी असताना पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मतदानाला होणाऱ्या विलंबावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबतची तक्रार दिली होती.
तसेच राज्य निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेचा अहवाल केंंद्रिय निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. यावरुनच आता केंद्रिय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज