टीम मंगळवेढा टाईम्स ।
मे महिना संपला असून जून महिना सुरू झाला आहे. जून महिन्यात सर्वांना मान्सूनचे वेध लागलेले असतात. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, नवा महिना सुरू होताच अनेक गोष्टींसंदर्भातील नियम बदलणार आहेत. त्याचा सर्वांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होईल. काय आहेत हे बदल? जाणून घेऊया.
दुप्पट टीडीएस कापणार
आयकर खात्याने आधार-पॅन जोडणी बंधनकारक केली आहे. ३१ मे हा त्यासाठी अखेरचा दिवस आहे. तसे न केल्या १ जूनपासून दुप्पट दराने टीडीएस कापण्यात येईल. यापूर्वी अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, यंदा मात्र मुदतवाढ दिलेली नाही.
वाहनचालक परवान्याची चाचणी देणे होणार सोपे
■ १ जूनपासून वाहनचालक परवान्याशी संबंधित नियमांत बदल होत आहे. इच्छुक वाहनचालकांना परवाना घेण्यासाठी वाहनचालक चाचणी आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवरही देता येणार आहे.
■ आरटीओमध्ये चाचणीसाठी जाण्याची गरज नाही. ज्या केंद्रांना आरटीओने मान्यता दिली आहे, तेच ही चाचणी घेऊ शकतील. याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.
अल्पवयीनांना देऊ नका गाडी, होईल मोठा दंड
■ १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीनाने गाडी चालविल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच अशा वाहनमालकाचादेखील वाहनचालक परवाना रद्द होऊ शकतो.
■ तसेच संबंधित अल्पवयीन चालकाला २५ वर्षांचे वय होईपर्यंत परवाना मिळणार नाही. अतिवेगात वाहन चालविल्यास यापुढे २ हजार रुपये, विनापरवाना वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड होईल.
गॅस, पेट्रोल यावेळी तरी होणार का स्वस्त?
■ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींचा आढावा घेऊन बदल जाहीर करतात. १ मे रोजी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले होते.
■ यावेळीदेखील किंमतीत बदल होऊ शकतो. याशिवाय घरगुती गॅसची किंमत तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोफत आहे सुविधा, आधार अपडेट करून घ्या
■ १० वर्षापासून आधार अपडेट केलेले नसल्यास लगेच करून घ्या. तशी सूचना गेल्या वर्षीच करण्यात आली होती. १४ जूनपर्यंत ही सेवा मोफत आहे. त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क भरावे लागेल.
■ यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून स्वतः आधार अपडेट केल्यास ही सेवा मोफत आहे. आधार केंद्रावर गेल्यास शुल्क भरावे लागेल. तेथे एका अपडे- टसाठी ५० रुपये शुल्क आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज