टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून एसबीआय या बँकेच्या नावाने व्हाट्सअप वर बनावट लिंक पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रकार घडत आहेत.
जे व्यक्ती या लिंक करतील वर अथवा एपीके फाईल डाऊनलोड करतील अशा लोकांचे बँक खात्यातील रक्कम पळवली जात आहे. तसेच व्हाट्सअप व मोबाईल हॅक करून ग्रुप वर बनावट मेसेज पाठवले जात आहेत.
सर्व नागरिकांनी अशा कोणत्याच बनावट लिंक वरती क्लिक करू नये अथवा एपीके फाईल डाऊनलोड करू नये अन्यथा आपल्या नुकसानीस स्वतः जबाबदार असाल त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे बंदी आहे.
कुर्डूवाडी परिसरात अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये पळवले
कुडुवाडी शहरातील अनेक व्यापारी वर्गाच्या बँक खात्यातील रक्कम एका लिंकमुळे उडाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ग्रुप वर अथवा पर्सनल व्हॉट्सअॅप लिंक येत होती.
सदर लिंकवर क्लिक करताच व्हॉट्सअॅप नंबर हॅक केला जात होता. त्यानंतर थोड्याच वेळात स्टेट बँक ऑफ इंडियासह विविध बँकेतील सर्व रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून काढून घेतली जात होती. सोमवार, दि.२७ मे रोजी रात्री ८ वाजल्या पासून ते दि.२८ मे दरम्यान हा प्रकार घडला.
याबाबत जयेश अशोककुमार बजानिया यांनी लेखी तक्रार कुर्दुवाडी पोलिसात दिली आहे. यात त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया सह विविध बँकेतील सुमारे दोन लाखाची रोकड गायब झाल्याचे म्हटले आहे.
असाच प्रकार अनेकांबाबत घडल्याची चर्चा सुरु होती. मंदार शहा यांनी ही त्यांच्या मोबाईलचे व्हॉटस्अॅप हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तर अनेकांनी सायबर ब्राँचकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.
याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कुर्दुवाडी ब्राँच मॅनेजर अविनाश वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदर प्रकरण वरिष्ठांना कळवल्याचे सांगितले तर सदर प्रकरणात बँकेकडून तक्रार झाली नसल्याने गुन्हा नोंद झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन
स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या नावाने आपल्या मोबाईलमध्ये ग्रुप तयार होतो. किंवा त्याचा मेसेज डायरेक्ट येतो, त्या लिंकवर चुकून क्लिक झाले तर तुमचे खाते रिकामे होत आहे. अनेक पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार येऊ लागल्या आहेत.
आपण अशा लिंकवर क्लिक करू नका, असे ग्रुप डिलीट करा किंवा मेसेज डिलीट करा. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज