टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व १३ उमेदवारांना निवडणूक कार्यालयाने नोटीस काढली आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी राहिल्याने भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासह सर्व उमेदवारांना नोटीस काढली आहे.
निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता २० एप्रिलपर्यंत करावी, असे नोटिशीत म्हटले आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते.
त्यात काही त्रुटी असल्यास नियमानुसार दुरुस्ती करण्याची संधी असते, अशी माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
प्रतीक्षापत्रातील त्रुटी अशा
१. प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर सही करणे आवश्यक असते. काही जणांनी काही पानांवर सही केली नाही. कला नाही.
२. काही ठिकाणी माहिती भरणे आवश्यक असताना लागू होत नाही, असे लिहले. इतरही काही किरकोळ त्रुटी आहेत. त्या सर्व त्रुटींची पूर्ता २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज