टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा.लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता २७११ रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत.
तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आवताडे शुगर चा हा दुसरा हंगाम सुरू असून पहिला हंगाम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच दुसऱ्या हंगामामध्येही शेतकऱ्यांनी आवताडे शुगर वर विश्वास दाखवून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पुरवठा केलेला आहे
शेतकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नसून शेतकरी हितासाठीच हा कारखाना आम्ही सुरू केला आहे.
चालू हंगामात आवताडे शुगरने ३ लाख ९२ हजार ४६० मे टन उसाचे गाळप आज अखेर केले असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके व कार्यकारी संचालक मोहन पिसे उपस्थीत होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज