टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तुरुंगातील आणखी 5 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 68 वर गेली आहे.
वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज एकही रॅपीड अॅन्टीजन टेस्ट अथवा कोरोना चाचणी करणेसाठी स्वॅब घेणेत आलेला नाही. तथापि काल दि.22 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत तहसिल कार्यालय येथील सबजेलमधील यापूर्वी रॅपीड अॅन्टीजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या 9 कैदयांचे स्वब घेणेत आलेले होते. ते सोलापूर येथे कोरोना चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविणेत आलेले होते.
त्यापैकी 7 कैदयांचे कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यातील 5 पॉझिटिव्ह तर 2 निगेटिव्ह अहवाल प्राप्त आहेत. उर्वरित 2 कैदयांचे अहवाल प्रलंबित आहेत.
वरील पाचही पॉझिटिव्ह कैदी हे विलगीकरण कक्षातील असून त्यांचे निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत पूर्ण करणेत आलेले असून संबंधितांना विलगीकरण कक्षात ठेवणेत आलेले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आज अखेर एकूण 68 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.तर आज 4 जणांना घरी सोडण्यात आले आहे. व आज अखेरपर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आणि 63 जण आज अखेर उपचार घेत आहेत.
कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षातील रूग्णांवर वैदयकीय विभागामार्फत लक्ष ठेवणेत येत असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज