टीम मंगळवेढा टाईम्स।
एका संस्था चालकाच्या घरी जावून शाळेत नोकरी दया अन्यथा नोकरीच्या बदल्यात ५ लाख रुपये दया असे म्हणून गच्चीला धरून गळ्यातील साडे तीन तोळयाची सोन्याची चैन
व बोटातील दोन तोळयाची अंगठी काढून घेतल्याप्रकरणी दिगंबर जावीर, भानुदास जावीर (रा. भाळवणी), आनंदा गेजगे (रा. नागणेवाडी) या तीघाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अविनाश शिंदे (वय ४६) यांची जालिहाळ व हिवरगांव येथे विदयानिकेतन विदयालय ही संस्था असून या संस्थेचे फिर्यादी हे अध्यक्ष आहेत.
संस्था विनाअनुदानित असताना आरोपी दिगंबर जावीर हे सन २०१२-१३ साली एक महिनाभर शिपाई म्हणून कामावर होते. या दरम्यान आरोपी हा दारू पिवून येत असल्याने त्यास शाळेत येवू नको म्हणून फिर्यादीने सांगितले होते.
दि.२९ जानेवारी रोजी दुपारी १.०० च्या दरम्यान फिर्यादी घरी असताना वरील तीघा आरोपींनी येवून तुमची संस्था अनुदानास पात्र झाली असून मला शिपाई म्हणून कामावर घ्या असे आरोपीने म्हणताच फिर्यादीने आता रिक्त जागा नाहीत त्यामुळे कामावर घेता येत नाही असे त्यांना सांगितले.
यावेळी आरोपीनी कामावर तर घ्या किंवा आम्हाला पाच लाख रुपये दया असे म्हणून फिर्यादीच्या गच्चीला धरून गळयातील साडे तीन तोळयाची चैन तसेच हाताच्या बोटातील दोन तोळ्याची पिळ्याची अंगठी घेवून गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच जाताना आरोपीने कामावर घेतले नाही तर तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देवून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दुपारी १.३० आरोपीने विदयानिकेतन विदयालय, जालिहाळ येथे येवून म्हणाले, तुम्ही शाळेची माहिती का देत नाही, असे म्हणून ऑफिसमध्ये जावून शाळेचे जनरल रजिस्टर फाडून
नुकसान करून टेबलवरून कागदपत्रे इतरत्र फेकून देवून मुख्याध्यापक प्रविण शिंदे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज