mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवार हे सोलापुरात येऊन गेल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर सोलापुरात; असा असणार दौरा; बेरजेचे राजकारण, पक्ष बांधणीसाठी दिला भरगच्च वेळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 3, 2024
in राजकारण, सोलापूर
कुछ तो गडबड है! अजित पवारांसोबत 40 आमदार बंडाच्या तयारीत? चर्चांना उधाण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे अलिकडे तीनवेळा सोलापुरात येऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शनिवारी दिवसभराच्या भेटीसाठी सोलापुरात येत आहेत.

यात प्रामुख्याने पक्ष बांधणीसाठी पक्षाच्या शहर व जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन, मेळावे, स्थानिक नेत्यांच्या भेटी, शरद पवार गट व अन्य पक्षातील माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार आणि अजित पवार गट अस्तित्वात आल्यानंतर अजित पवार गट पक्ष बांधणीसाठी सोलापुरात प्रथमच सक्रिय झाला आहे. पक्षाच्या शहर व जिल्हा कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर स्वतंत्र कार्यालयेही थाटण्यात आली आहेत.

जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ पंखा विहीर परिसरात पक्षाचे जिल्हा कार्यालय तर जुनी गिरणी आवाराजवळील चौकात शहर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होत आहे.

आज सकाळी ९.३० वाजता लातूर येथून सोलापुरात हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर अजित पवार हे प्रथम ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विकासकामांचा औपचारिक आढावा घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आयोजिलेले सर्व पक्षीय कार्यक्रम आयोजिले आहेत.

रामवाडी परिसरात माजी नगरसेवक किसन जाधव यांनी आयोजिलेले महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या शुभारंभासह अन्य विविध विकास कामांचाही शुभारंभ पवार यांच्या हस्ते होणार आहे. जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात आयोजिलेल्या पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात त्यांचे मार्गदर्शन होणार असून

तत्पूर्वी, जुनी गिरणी आवाराजवळील शहर कार्यालयाच्या उद्घाटनासह आयोजित मेळाव्यात शरद पवार गटाचे बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, किशोर पाटील आदींसह अन्य नेते व कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश घेणार आहेत.

सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृहात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात शिष्टमंडळासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांनाही अजित पवार भेटणार आहेत. राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाने आयोजिलेल्या ट्रस्टी संवाद कार्यक्रमातही अजित पवार हे सहभागी होणार आहेत.

तर वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे गेली तीन वर्षे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. ते अजित पवार गटाशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे पवार हे चंदनशिवे यांच्या बुधवार पेठेतील निवासस्थानीही भेटीसाठी जाणार आहेत.

रात्री ति-हे (ता. उत्तर सोलापूर) येथे माजी आमदार दिलीप माने यांनाही ते भेटणार आहेत. माने हे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटात असले तरी तेथे सक्रिय नाहीत.

आगामी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्याच्या त्यांच्या हालचाली दिसत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीतून माने हे कोणता राजकीय निर्णय घेणार, याचीही स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारसोलापूर

संबंधित बातम्या

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

पदरी निराशा! कांद्याची आवक घटल्यानंतरही भाव गडगडलेलेच; भाव 'इतक्या' रुपयांवर स्थिर; निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा