mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा पावसाने सुखावला! ‘या’तालुक्यात संततधार, अनेक रस्ते पाण्याखाली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्हा पावसाने सुखावला! ‘या’तालुक्यात संततधार, अनेक रस्ते पाण्याखाली

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात सतत पाचव्या नक्षत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली. शुक्रवार व शनिवारी दुपारी सर्वत्र पाऊस पडला. पूर्व भागातील तालुक्यात मुसळधार वृष्टी करीत हाहाकार उडवून दिला, तर पश्चिम भागातील तालुक्यात संततधार पाऊस झाला.

सकाळपर्यंत जिल्ह्यात २७० मिलिमीटर पाऊस झाला. अक्कलकोटमध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. सीमावर्ती भागात प्रवासी वाहतूक जीप पाण्यात अडकली. दोन दुचाकीस्वार वाहून गेले, मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने ते वाचले. सबंध जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर झाला. यामुळे बळीराजा सुखावला आहे.

चपळगाव : पुष्य नक्षत्राच्या पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच चपळगाव मंडलात जोरदार हजेरी लावली. यामुळे अक्कलकोट-तुळजापूर मार्गावरील चपळगाव जवळच्या ओढ्यावरील ८ फूट उंचीचा भरावा वाहून गेला आहे.

यामुळे बोरी व हरणा नदी प्रवाहित झाल्याने कुरनूर धरणाच्या जलसाठ्यात भर पडत आहे. जवळपास तीन तास पडलेल्या पावसाने चपळगाव, हन्नूर, चुंगी, पितापूर, डोंबरजवळगे, चपळगाववाडी, दहिटणे, किणी, सिंदखेड, मोट्याळ, कुरनूर आदी गावांसह पंचक्रोशीला चांगलेच झोडपले. या पावसाने नद्या, नाले, लघुप्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर जलस्त्रोत प्रवाहित झाल्याचे पाहावयास मिळाले.

सलग चार तास पडलेल्या पावसाने करजगी येथील जुने वाठलेले एकशे दहा वर्षांपूर्वीचे चिंचेचे   झाड उन्मळून पडले. त्यामुळे पानमंगरुळ ते करजगी रस्त्यावरची वाहतूक तब्बल सहा तास खोळंबली. ग्रामस्थांनी हे झाड रस्त्यावरून बाजूला केले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून करजगी, पानमंगरुळ, सुलेरजवळगे या गावात जोरदार पावसाला सुरुवात झाली. चार तास सलग पाऊस पडल्याने नद्या-नाल्यांनी पाणी वाहू लागले.

तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरण गळोरगी, शिरवळवाडी, घोळसगाव, किरनळ्ळी येथील साठवण तलाव, हंजगी आदी गावच्या साठवण तलावात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तोरणी, खानापूर, गळोरगी, कोन्हाळी, मुंढेवाडी, बोरोटी बु., भोसगे, मुगळी, मराठवाडी, गुड्डेवाडी, दोड्याळ, घुंगरेगाव, बासलेगाव आदी गावातून पावसाचे पाणी ओढा वाहिल्यासारखे वाहत होते. या गावच्या परिसरातील लहान-मोठे ओढे भरून वाहिले.

शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्याने बासलेगाव-गळोरगी रस्त्यावरील ओढा भरून पुलावरून पाणी वाहत होते. जकापूर येथील गवळी प्रकाश हन्नुरे (४०, रा. जकापूर) हे दूध घेऊन अक्कलकोटकडे येत होते. पाऊस सुरू असताना धाडस करून वेगाने वाहणाºया पाण्यातून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगामुळे ते खाली पडून वाहत जाताना प्रसंगावधान ओळखून बासलेगाव येथील विश्वनाथ साखरे, राम गायकवाड, सागर पाटील यांनी त्यांना वाचविले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विद्यार्थ्यांना दिलासा! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत ‘हा’ निर्णय घेणारा महाराष्ट्र पहिलेच राज्य

विद्यार्थ्यांना दिलासा! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत 'हा' निर्णय घेणारा महाराष्ट्र पहिलेच राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा