टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मृत्यूदर ही वाढत चालला आहे.शनिवारी कोरोनामुळे तब्बल सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 69 एवढी झाली आहे. Corona killed six people in a single day in rural Sholapur
शनिवारी ग्रामीण भागात एकूण 137 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 666 एवढी झाली आहे.
शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्यातील चौघांचा जणांचा समावेश आहे. बार्शीतील 65 वर्षीय महिला, वैराग येथील 65 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला,कुसलंब येथील 72 वार्षिय पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोट माणिक पेठ येथील 76 वर्षीय पुरुष तर पंढरपूर रोहिदास चौक येथील 72 वर्षीय 52 वर्षीय पुरुष यांचा आज मृत्यू झाला.
‘या’ भागात नवे रुग्ण आढळले
विठ्ठल मंदीर जवळ ,अक्कलकोट ,डबरे गल्ली , अक्कलकोट. फंड गल्ली , करमाळा . वेताळ पेठ , करमाळा. अळसुंदे , करमाळा . सालसे , करमाळा. पडसाळी , ता.माढा. रिधोरे , ता.माढा. अनगर , ता.मोहोळ. कामती ( बु ) , ता.मोहोळ. खंडाळी , ता.मोहोळ. कोरवली , ता.मोहोळ. हिरज , ता.उत्तर सोलापूर. पडसाळी , ता.उत्तर सोलापूर . अंबाबाई पटांगण , पंढरपूर. अनिल नगर , पंढरपूर . डाळे गल्ली , पंढरपूर . ज्ञानेश्वर नगर , पंढरपूर . गांधी रोड , पंढरपूर . गाताडे प्लॉट , पंढरपूर. घोंगडे गल्ली , पंढरपूर गोविंदपुरा , पंढरपूर . इसबावी , पंढरपूर . कदबे गल्ली , पंढरपूर. नवी पेठ , पंढरपूर . रेल्वे कॉलनी , पंढरपूर . सैह्याद्री नगर , पंढरपूर . सांगोला रोड , पंढरपूर . संत पेठ , पंढरपूर सिध्दीविनायक सोसायटी , पंढरपूर . विठ्ठल हॉस्पीटल क्वॉर्टर , पंढरपूर . अंबे, ता. पंढरपूर . देगाव , ता . पंढरपूर.
कोर्टी , ता . पंढरपूर . सरकोली , ता . पंढरपूर . जवळा , ता.सांगोला जुनोनी , ता.सांगोला वाझरे , ता.सांगोला कंदलगाव , ता.दक्षिण सोलापूर . हत्तुर , ता.दक्षिण सोलापूर . आडवा रस्ता , बार्शी . अलीपुर रोड , बार्शी . बागवान प्लॉट , बार्शी . भवानी पेठ , बार्शी . बारंगुळे प्लॉट , बार्शी . बुरुड गल्ली , बार्शी . धनगर , बार्शी . हांडे गल्ली , बार्शी . जावळे प्लॉट , बार्शी . लोखंड गल्ली , बार्शी . मलिक चौक , बार्शी . मुळे प्लॉट , बार्शी . पाटील चाळ , बार्शी . पाटील प्लॉट , बार्शी . सवळे गल्ली , बार्शी . सिध्देश्वर नगर , बार्शी . वानी प्लॉट , बार्शी . धोत्रे , ता.बार्शी . हालदुगे , ता.बार्शी . इलें , ता.बार्शी . जामगाव , ता.बार्शी . पानगाव , ता.बार्शी . सर्जापुर , ता.बार्शी . सासुरे , ता.बार्शी . वैराग , ता.बार्शी या भागात रुग्ण सापडले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित रुग्णांची संख्या
अक्कलकोट-426, बार्शी-665, करमाळा-68, माढा-96, माळशिरस-108, मंगळवेढा-64, मोहोळ-192, उत्तर सोलापूर-215, पंढरपूर-310, सांगोला-36, दक्षिण सोलापूर-486, एकूण-2 हजार 666
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज