टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नगरपालिका हद्दीत असणाऱ्या सर्व व्यापारी, भाजी पाला, फळ विक्रेते व त्या दुकानात काम करणारे कर्मचारी यांना ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक केले असल्याची माहिती कर निरीक्षक व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे यांनी दिली आहे. Professionals are required to test the corona; mangalwedha Municipal decree
नगरपालिका हद्दीतील सर्व व्यावसायिकांना प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व व्यापारी, भाजी पाला, फळ विक्रेते व त्या दुकानात काम करणारे कर्मचारी यांना ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक केले आहे.
येत्या चार दिवसात कोरोना टेस्ट करून घ्यावी अन्यथा चार दिवसानंतर जे कोणी टेस्ट करत नाही तोपर्यंत आपले दुकान बंद करण्यात येईल असे प्रांताधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीतमध्ये सूचित करण्यात आले आहे.
आतापर्यंत सर्व शासकीय कर्मचारी, बॅंका व कैदी यांची टेस्ट घेण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूंचा प्रभाव 60 वर्षा वयोमर्यादा पुढील व्यक्ति, 10 वर्षा वयोमर्यादा आतील लहान मुले व BP शुगर असणारे व्यक्ति यांना घातक आहे.तरी हा रोग एका व्यक्ति कडून दुसर्या व्यक्ति व कुटुंबातील व्यक्ति मध्ये संसर्ग होत असल्याने कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले आहे, सर्वानी टेस्ट करून घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा कर निरीक्षक व प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे यांनी दिली आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज