mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 16, 2024
in मंगळवेढा, राजकारण
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

टीम मंगळवेढा टाईम्स। 

धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्या निमित्त दामाजी रोड, मंगळवेढा येथे दि.17, 18 व 19 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचलिका अ‍ॅड.दिपाली काळुंगे-पाटील यांनी दिली आहे.

धनश्री परिवाराची ही प्रतिष्ठेची पंचवीस वर्षे समाजकारण आणि अर्थकारणाची परंपरा बनली. ठेवीदारांचा विश्वास जपणं हीच मूल्यवान बांधिलकी समजून काम केले. सामान्यांचे संसार उभे करणारी अर्थनीती माणसांनी ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच जतन केली.

गेल्या पंचवीस वर्षांतील वाटचालीचा, त्याच्या सिंहावलोकनाचा यथार्थ अभिमान म्हणून हा सोहळा साजरा होत आहे. उद्या बुधवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी 10 वा.सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

सदर महाआरोग्य शिबिराचे उदघाटन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्यासह इतर मान्यवर उस्थितीत राहणार आहेत.

दुपारी 2 वा.धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मीनल साठे हे राहणार आहेत. प्रमुख वक्त्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. प्रीती शिंदे यांचेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील 21 पतसंस्थांच्या महिला चेअरमन यांचा सत्कार संपन्न होणार आहे. तसेच धनश्री महिला पतसंस्थेच्या सर्व आजी-माजी संचालकांचा सत्कार व गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात येणार आहे.

सायंकाळी 7 वाजता कुणाल मचाले सादरकृत मराठमोळ्या संस्कृतीचा नृत्य, गीत व संगीताचा अविष्कार असणारा आपली संस्कृती या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते तर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

गुरुवार दि.18 जानेवारी सकाळी 9.30 वा.संत परंपरेतील कीर्तनकार व प्रवचन करांचा गौरव म्हणून संतपूजा हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी यांच्या हस्ते होणार आहे.

अध्यक्षस्थानी विष्णुपंत आवताडे हे राहणार आहेत. यावेळी संत विचार आणि आजचा समाज या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प बापूसाहेब महाराज देहुकर, वासकर महाराज फडप्रमुख ह भ प चैतन्य महाराज वासकर, संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. डॉ.जयवंत महाराज बोधले हे उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 2 वाजता धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टिस्टेट तपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यादरम्यान कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच धनश्री मल्टीस्टेटच्या आजी-माजी संचालकांचा सत्कार, शिलाई मशीन वाटप, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे अमृत महोत्सवी स्मरणिकाचे प्रकाशन व धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाची सभासदांना भेट देण्यात येणार्‍या चांदीच्या नाण्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सायंकाळी 7 वा. धनश्री व सिताराम परिवार आयोजित उषा मंगेशकर संगीत रजनी मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार शिरोमणी शुगरचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यादरम्यान सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, पार्श्वगायिका कविता पौडवाल, हास्यजत्रा फेम पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे, महाराष्ट्राचा महागायक विजेता महंमद आयाज हे गायक उपस्थित राहून आपल्या सदाबहार मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहेत.

शुक्रवार 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मंगळवेढा शिवार वैभव म्हणून शेतीतील सर्वोत्कृष्ठ उत्पादन पिकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख हस्ते तर अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. नंदकुमार पवार हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कृषी विभागातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वा. तरुणाईचा भारत या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, विजय चोरमारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबुराव गायकवाड तरी अध्यक्षस्थानी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 4 वा. धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृतमहोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व कारखान्याचे चेअरमन, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होणार आहेत.

तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू सिताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, धनश्री व सिताराम परिवाराच्या संचालिका स्नेहल काळुंगे – मुदगल यांचेसह प्रा. शिवाजीराव काळुंगे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रा.शिवाजीराव काळुंगे

संबंधित बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
Next Post
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

नागरिकांनो! धनश्री व सीताराम परिवाराच्या वतीने आज मंगळवेढ्यात सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिर; संस्कृती, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा