mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! धनश्री व सीताराम परिवाराच्या वतीने आज मंगळवेढ्यात सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिर; संस्कृती, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 17, 2024
in आरोग्य, मंगळवेढा
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

टीम मंगळवेढा टाईम्स ।

धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळ्या निमित्त दामाजी रोड, मंगळवेढा येथे आजपासून दि.18 व 19 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचलिका अ‍ॅड.दिपाली काळुंगे-पाटील यांनी दिली आहे.

धनश्री परिवाराची ही प्रतिष्ठेची पंचवीस वर्षे समाजकारण आणि अर्थकारणाची परंपरा बनली. ठेवीदारांचा विश्वास जपणं हीच मूल्यवान बांधिलकी समजून काम केले. सामान्यांचे संसार उभे करणारी अर्थनीती माणसांनी ठेवलेल्या विश्वासाच्या बळावरच जतन केली.

आज सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन

गेल्या पंचवीस वर्षांतील वाटचालीचा, त्याच्या सिंहावलोकनाचा यथार्थ अभिमान म्हणून हा सोहळा साजरा होत आहे. आज बुधवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी 10 वा.सर्वरोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

सदर महाआरोग्य शिबिराचे उदघाटन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांच्यासह इतर मान्यवर उस्थितीत राहणार आहेत.

आज दुपारी 2 वा.धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते  होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मीनल साठे हे राहणार आहेत. प्रमुख वक्त्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ.प्रीती शिंदे यांचेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील 21 पतसंस्थांच्या महिला चेअरमन यांचा सत्कार संपन्न होणार आहे. तसेच धनश्री महिला पतसंस्थेच्या सर्व आजी-माजी संचालकांचा सत्कार व गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात येणार आहे.

आज सायंकाळी 7 वाजता कुणाल मचाले सादरकृत मराठमोळ्या संस्कृतीचा नृत्य, गीत व संगीताचा अविष्कार असणारा आपली संस्कृती या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते तर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

गुरुवार दि.18 जानेवारी सकाळी 9.30 वा.संत परंपरेतील कीर्तनकार व प्रवचन करांचा गौरव म्हणून संतपूजा हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी यांच्या हस्ते होणार आहे.

अध्यक्षस्थानी विष्णुपंत आवताडे हे राहणार आहेत. यावेळी संत विचार आणि आजचा समाज या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिसंवादासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प बापूसाहेब महाराज देहुकर, वासकर महाराज फडप्रमुख ह भ प चैतन्य महाराज वासकर, संत नामदेव महाराजांचे वंशज निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. डॉ.जयवंत महाराज बोधले हे उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 2 वाजता धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टिस्टेट तपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यादरम्यान कर्तबगार महिलांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच धनश्री मल्टीस्टेटच्या आजी-माजी संचालकांचा सत्कार, शिलाई मशीन वाटप, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे अमृत महोत्सवी स्मरणिकाचे प्रकाशन व धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाची सभासदांना भेट देण्यात येणार्‍या चांदीच्या नाण्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सायंकाळी 7 वा. धनश्री व सिताराम परिवार आयोजित उषा मंगेशकर संगीत रजनी मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार शिरोमणी शुगरचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यादरम्यान सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, पार्श्वगायिका कविता पौडवाल, हास्यजत्रा फेम पार्श्वगायिका अनुष्का शिकतोडे, महाराष्ट्राचा महागायक विजेता महंमद आयाज हे गायक उपस्थित राहून आपल्या सदाबहार मराठी हिंदी गीतांचा लाईव्ह कार्यक्रम पार पडणार आहेत.

शुक्रवार 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मंगळवेढा शिवार वैभव म्हणून शेतीतील सर्वोत्कृष्ठ उत्पादन पिकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख हस्ते तर अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. नंदकुमार पवार हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कृषी विभागातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10 वा. तरुणाईचा भारत या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, विजय चोरमारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबुराव गायकवाड तरी अध्यक्षस्थानी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 4 वा. धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळा व अमृतमहोत्सवी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सह जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व कारखान्याचे चेअरमन, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होणार आहेत.

तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू सिताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, धनश्री व सिताराम परिवाराच्या संचालिका स्नेहल काळुंगे – मुदगल यांचेसह प्रा. शिवाजीराव काळुंगे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरोग्य शिबीरप्रा.शिवाजीराव काळुंगे

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत; जनतेतून निवड; पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार

July 11, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

चमत्कार! डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारा वेळी रडले; महिलेने त्याला कुशीत घेताच बाळ रडले जिवंत असल्याचे झाले निष्पन्न

July 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

खळबळजनक! विहिरीतील पाण्यामध्ये पडल्याने मंगळवेढ्यातील डॉक्टराचा मृत्यू; पोलीस ठाण्यात खबर दाखल

July 10, 2025
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रकिया सुरु; विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

दर्जेदार शिक्षण! DMKG काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू; प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालणार; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 10, 2025
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

July 9, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

पांडुरंगाच्या भाविकावर काळाचा घाला! मंगळवेढ्यात वारीहून गावाकडे परतणाऱ्या दोघा वारकऱ्यांना वाहनाची धडक एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

July 7, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मंगळवेढ्यातील ‘या’ स्मारकाबाबत लवकरच निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

July 6, 2025
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ सरपंचाला शाळेत शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याची दुर्देवी वेळ; आमदार साहेब येण्याच्या दिवशी शिक्षक पाठवून डोळे पुसण्याचा केला प्रयत्न

कामाची बातमी! सोलापूर झेडपीने शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर केली अपलोड; 'इतक्या' शिक्षकांची निघाली भरती

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या…

July 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खबरदार! ‘या’ तारखेला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारला इशारा

July 14, 2025
दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 14, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा