टीम मंगळवेढा टाईम्स ।
एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्याच्या चर्चेनं लोकांमध्ये चिंता वाढत असताना सोलापुरात गुरुवारी एका तरुणाचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं निमित्त होऊन त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
सुनील शंकर कांबळे (वय- २०, रा. रमाबाई आंबेडकर नगर, बुधवार पेठ, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. यातील न्यू बुधवार पेठेत राहणारा तरुण सुनील याला
बुधवारी रात्री श्वासोत्सवास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून येथील शासकीय रुग्णालयात निमित केसपेपर करुन उपचारासाठी दाखल करण्यात आले.
संबंधित तरुणाची तब्येत चिंताजनक वाटत असल्याने डॉ.पूजा बडवे यांनी गुरुवारी सकाळी त्याचा एमएलसी केस पेपर केला.
सदर तरुण बेशुद्धावस्थेत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ८:४५ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज