mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुंबईत वाढता मृत्यूदर चिंताजनक,देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मुंबईत वाढता मृत्यूदर चिंताजनक,देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय.मुंबईत सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. Death toll in Mumbai alarming, Devendra Fadnavis’s letter to CM

मुंबईत सातत्यानं कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतोय. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलंय.

वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मुंबईतील चाचण्यांची संख्या कमीच असल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

यागोष्टी लक्ष वेधत फडणवीस म्हणाले की, 23 जुलै 2020 पर्यंत मुंबईत 4 लाख 62 हजार 221 चाचण्या झाल्या आहेत, तर 23 जुलैपर्यंत पुण्यात 3 लाख 54 हजार 729 चाचण्या झाल्या आहेत. अगदी 17 ते 23 जुलै या आठवड्याचा विचार केला तर 41 हजार 376 चाचण्या मुंबईत झाल्या आहेत. तर याच कालावधीतील पुण्याच्या चाचण्या 85 हजार 139 इतक्या आहेत, अशी माहिती फडणवीसांनी आपल्या पत्रात लिहिली आहे.

याची तुलना करत फडणवीस यांनी पत्रात पुढे लिहिलं की, मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत. पुण्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील चाचण्या अतिशय कमी होत आहेत. 1 ते 23 जुलै या काळात मुंबईत 1 लाख 28 हजार 969 चाचण्या झाल्या आहेत. या 23 दिवसांची सरासरी काढली तरी ती 5607 इतकी येते.

मुंबईत कमी चाचण्या करणे हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्यासारखे होईल. याचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होतोय. पुण्याचा मृत्यूदर 2.39 टक्के असून, मुंबईचा मृत्यूदर हा 5.60 टक्के झालाय. महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर हा 3.68 टक्के असून मुंबईचा मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण हे कमी संख्येने होणार्‍या चाचण्या आहेत, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

एकट्या मे महिन्यातील मुंबईतील मृत्यू पाहिले तर मे 2019 च्या तुलनेत मे 2020 मध्ये मुंबईत 5500 मृत्यू हे अधिकचे झाले आहेत. संसर्गाचे प्रमाण सातत्याने 20 ते 23 टक्क्यांच्या आसपास राहणे, ही चिंतेची बाब असून ते किमान 5 टक्क्यांच्या आसपास असावे, यासाठीचे नियोजन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पुण्यात चाचण्यांची संख्या वाढविली जाणे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्या प्रमाणात व्यवस्था राज्य सरकारतर्फे वाढवल्या जात नाही. आरोग्य व्यवस्था ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब असून सुद्धा महापालिकांना पुरेशी मदत सरकारकडून देण्यात येत नाही आहे. चाचण्यांची संख्या वाढवत असताना पुरेशा व्यवस्था उभारल्या नाही, तर अडचणींमध्ये आणखी वाढ होणारेय. त्यामुळे एकीकृत विचार याबाबतीत करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis letter sent uddhav thackeray

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर पालकमंत्र्याची तत्परता,गाडीतून उतरुन अपघातातील जखमींना केली मदत

सोलापूर पालकमंत्र्याची तत्परता,गाडीतून उतरुन अपघातातील जखमींना केली मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा