mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! कोरोनाने चिंता वाढवली, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; काय घडतंय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 27, 2023
in राज्य
आनंदाची बातमी! मंगळवेढ्यात आज शुगर व HbA1c तपासणीचे मोफत शिबीर; समर्थ पॅथॉलॉजीच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कोरोनाने डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे.

आरोग्य विभागाकडून संभाव्य धोका लक्षात घेता सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. असं असताना आता राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.

कोरोनाबाधितांची आकडेवारी आता 168 वर पोहोचली आहे. यामध्ये कोरोनाच्या नव्या JN-1 व्हेरिएंटने बाधित झालेल्या 10 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट फार जलद गतीने संक्रमित होणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच संभाव्य संकट लक्षात घेता राज्य सरकारने नव्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात आली आहे. या टास्कफोर्समध्ये दिल्ली आय.सी.एम.आर.चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर,

एम.यु.एच.एस. नाशिकच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानीटकर, पुण्याचे बी. जे. मेडीकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकते, नवले मेडीकल कॉलेजच्या डॉ. वर्षा पोतदार, पुण्याच्या नवले मेडीकल कॉलेजचे डॉ. डी. बी. कदम (फिजिशियन) यांच्यासह आणखी काही दिग्गज डॉक्टरांचा समावेश आहे.

सरकारच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच त्यावर उपाय योजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदला (टास्क फोर्सची) निर्मिती करण्यात आली होती.

कोविड बाधेची कारणिमांसा, विश्लेषण आणि उपाययोजना करण्यास्तव तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले होते. राज्यात पुन्हा एकदा कोविड-१९ ची रुग्ण संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता सदर टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.

सबब, सदर टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्य शासनाच्या आदेशात म्हटलं आहे. या आदेशात टास्क फोर्सची कामेदेखील अधोरेखित करण्यात आली आहेत.

टास्क फोर्स काय काम करणार?

गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे. कोविड-१९ क्रिटिकल केअर हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.
गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे.

टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी ठरविल्याप्रमाणे इतर कोणतीही शिफारस.
टास्क फोर्सने केलेल्या शिफारशींचा अहवाल सदस्य सचिव यांनी शासनास वेळोवेळी कळविण्यात यावे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 103 वर

विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आता पुन्हा कोरोना संक्रमणाचा प्रकोप बघायला मिळतोय. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 19 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 103 वर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभराच 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना आढावा

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
ग्रंथतुला करून भिमाशंकर तोडकरी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

ग्रंथतुला करून भिमाशंकर तोडकरी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा