टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत ‘भटक्या जमाती-क’ प्रवर्गातील धनगर समाजातील बेघर लाभार्थीना घरकूल मिळणार आहे. त्यासाठी १० जानेवारी २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक मनीषा फुले यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री योजनेतून, राज्य सरकारच्या आवास रमाई, शबरी व आता मोदी आवास योजनेतून विविध प्रवर्गातील लाभार्थीना घरकुलांचा लाभ मिळाला. परंतु, धनगर समाजातील बेघरांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना असूनही अनेकांना त्याचा
लाभ मिळालेला नाही.
किंबहुना या योजनेचा प्रचार- प्रसार अपेक्षित झालेला नाही, अशी स्थिती आहे. आता इतर मागास बहुजन कल्याण विभागाने धनगर समाजातील बेघर लाभार्थीसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात २५ हजार घरकुलांना मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत पात्र लाभार्थीकडून प्रस्ताव मागविले जात आहेत.
तत्पूर्वी, मागील दोन वर्षातील लाभार्थीना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यांना निधीही वितरित करण्यात आला आहे.
यावर्षीचे उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर धनगर समाजातील बेघर लाभार्थ्यांच्या घरकुलांचे प्रस्ताव मुदतीत सादर करण्याचे आदेश सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
प्रस्तावाचा फॉन्ट अचूक असण्याची अट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात म्हणजेच आयसीएम व्ही-६ डीव्हीओटी- सुरेख (युनिकोड) या फॉन्टमध्ये हार्डकॉपी व सॉफ्टकॉपी कार्यालयास १० जानेवारीपर्यंत सादर करावेत, विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील, अशी ताकीद सहायक संचालकांनी गटविकास अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून दिली आहे.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज