mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भयंकर! हिटर फुटलं अन् उकळतं पाणी घरात; आई-वडिलांसह मुलगीही भाजली; बटन बंद करण्याचे विसरले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 19, 2023
in सोलापूर
काळजी घ्या! ‘गोवर’ची सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री? उपचार सुरू; अशी आहेत आजाराची लक्षणे

टीम मंगळवेढा टाईम्स। 

थंडीचे दिवस असल्याने पाणी तापवण्यासाठी हिटरचे बटन चालू केले, मात्र ते बंद करण्याचे विसरल्याने हिटर गरम होऊन फायबरची टाकी फुटली. अन् उकळतं पाणी सबंध घरभर पसरल्याने यामध्ये नऊ वर्षाची बालिका आणि पती-पत्नी असे तिघे जण गंभीररीत्या भाजले.

सोमवारी पहाटेच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे ही धक्कादायक घटना घडली. अजिंक्या समाधान जगताप (वय ९), समाधान सदाशिव जगताप (वय- ३५), दीपाली समाधान जगताप (वय- ३०, तिघे रा. सोहाळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर)

असे भाजलेल्या तिघांची नावे आहेत. या सर्वांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नातलग ज्योतिबा जगताप यांनी दाखल केले आहे.

यातील समाधान जगताप हे त्यांची मुलगी व पत्नीसमवेत सोहाळे येथील गावात राहतात. गरम पाणी तापवण्यासाठी त्यांनी ५०० लिटर क्षमतेच्या फायबरच्या टाकीला हिटर बसवून घेतले होते. थंडीचे दिवस असल्याने आणि लाईट अधून-मधून जाते म्हणून रात्री पाणी तापवण्यासाठी हिटरचे बटन चालू केले होते.

काही तासानंतर बटन बंद करण्याऐवजी विसरून गेल्याने टाकीतील पाणी उकळले गेले. हिटरही तापून, टाकी फायबरची असल्याने ती फुटून जवळपास ५०० लिटर पाणी तिघे जण झोपलेल्या अंथरुणावर पसरले.

गरम पाण्याच्या चटक्याने तिघांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले. त्यांना गरम पाण्यापासून दूर केले.

तातडीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणून दाखल करण्यात आणल्याचे भाजलेल्या समाधान जगताप यांचे सोलापुरातील बंधू ज्योतिबा जगताप यांनी सांगितले.

७० टक्के भाजली..

तिघांवरही शासकीय रुग्णालयातील बर्न केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यातील नऊ वर्षाची अजिक्या ही ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून, सर्वांवर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे ज्योतिबा जगताप यांनी स्पष्ट केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हिटर फुटले

संबंधित बातम्या

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
Next Post
Job Update! तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे; मंगळवेढ्यातील ‘शांतीसागर इंण्डेन गॅस एजन्सी’मध्ये नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार

अर्जंट भरती! मंगळवेढ्यातील रिलायन्स पंपावर 'या' पदासाठी निघाली भरती; पगारही मिळणार भरपूर

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा