टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून दि.१९ ऑक्टोबर रोजी राहत्या घरातून विशाल सुरेश कोळी (वय १४ वर्षे) या अल्पवयीन शाळकरी मुलास अज्ञात इसमाने
कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलाची आई आव्वाबाई सुरेश कोळी (वय ४७) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंधळगाव येथील फिर्यादी आव्वाबाई कोळी या मोठा मुलगा राहुल व लहान विशाल असे एकत्रात रहात आहेत. मोठा मुलगा राहुल हा इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे व विशाल हा इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. दोन्ही मुले आश्रम शाळा देगांव येथे शिक्षण घेत आहेत.
विशाल हा देगांव येथून मामाचा मुलगा रखी आजारी पडला म्हणून शाळेतून आंधळगाव येथे घेवून आला होता. दि. १९ ऑक्टोबर करोजी सकाळी ८ वाजता विशाल हा मी शाळेला जातो असे म्हणाला होता. त्यानंतर आई शेलेवाडी येथे मजुरीने कामास गेली परंतु त्यावेळी मुलगा विशाल हा घरीच होता.
त्यानंतर आई कामावरुन दुपारी ४ च्या सुमारास घरी आली तेव्हा विशाल घरी दिसला नाही म्हणून त्याचा आजूबाजूस शोध घेतला. त्याचे मित्राकडे चौकशी केली तो ज्या शाळेत आहे त्या शाळेत देगाव येथे फोन करुन विचारपूस केली.
तसेच पाहुण्यांकडे त्याची चौकशी केली असता तो कुठेच नसल्याचे समजले. त्यामुळे मुलगा विशाल याला कोणीतरी फूस लावून पळवून घेवून गेले असल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज