टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकरी सभासदांनी आपला ऊस संत दामाजी कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे यांनी केले. संत दामाजी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ सालचा ३१ वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
संत दामाजी साखर कारखान्याचा ३१ वा गळीत हंगाम शुभारंभ मंगळवार दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन अँड नंदकुमार भागवत पवार, माजी व्हा. चेअरमन श्री रामचंद्र शंकर वाकडे, संस्थापक संचालक सर्वश्री मनोहर गंगाराम कलुबर्मे,
भुजंगराव यशवंतराव पाटील, प्रकाश कृष्णा गायकवाड, दिलीप गंगाराम मर्दा, आबासो दाजी बेदरे, संस्थापक संचालिका सौ. मंगल सुखदेव दुधाळ, सौ. मंदाकिनी भिमाशंकर बिराजदार यांचे शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे सुरुवातीला कारखान्याचे संचालक श्री राजेंद्र चरणुकाका पाटील व त्यांच्या पत्नी सौ.मंजुषा राजेंद्र पाटील यांचे शुभ हस्ते ऊस गव्हाणीसमोर श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली.
पुढे बोलताना प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. मारवाडी वकील साहेबांनी अत्यंत काटकसरीने कारखाना चालविल्याने शेतक-याचे हे मंदिर सुरक्षित आहे. मारवाडी वकीलानी संस्था चालविताना कोणत्याही निवडणूकीसाठी कारखान्यातून कधी खर्च केला नाही. दामाजी कारखान्याचा ऊस वजन काटा अचुक असल्याने शेतक-यांचा या कारखान्यावर विश्वास आहे.
या संचालक मंडळाने अत्यंत काटकसरीने हा कारखाना चालविला आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे पारदर्शक काम करावे लागणार आहे. धनश्रीच्या माध्यमातून या कारखान्यास आजपर्यंत मदत करीत आलो असून यापुढेही मदत करणार आहे. मागील हंगामातील ऊसाचा दर गेल्यावर्षीच्या एफ. आर. पी. पेक्षा जास्त दिल्याने हे संचालक मंडळ अभिनंदनास पात्र असलेचे ते म्हणाले.
श्री मनोहर कलुबर्मे म्हणाले, संस्थापक संचालक यांचे हस्ते आजचा हा कार्यक्रम होत असल्याने इतिहासात नोंद होईल अशी ही घटना आहे. तसेच हे संचालक मंडळ चांगल्या प्रकारे काम करत असून सभासदांच्या विश्वासास हे संचालक मंडळ पात्र ठरले असल्याचे ते म्हणाले.
सदर प्रसंगी माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार म्हणाले, मागील संचालक मंडळाने पुढील हंगामात निघाणा-या साखरेवर ३६ टक्के व्याजाने कर्ज काढून ठेवले होते. कारखाना कधीच चालू होणार नाही अशी परिस्थिती करुन ठेवली होती. परंतु या संचालक मंडळाने हा कारखाना चालू करुन दाखविला.
मंगळवेढ्यातील स्थानीक बँकांनी आर्थिक मदत केली. गेल्या वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर शेतक-यांना दिला असल्याने हे संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. दामाजी कारखान्याची रिकव्हरी इतर कारखान्याच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे सभासद शेतक-यांनी आपला ऊस संत दामाजी कारखान्यास देणेचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
या कार्यक्रमाचे वेळी चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले, कारखान्याची मागील हंगामाची एफ. आर. पी. रु.२२९६.४५ असुन कारखान्याने रु. २३००/- प्रमाणे बिल दिले आहे. येणाऱ्या दिपवाळी सणासाठी शेतकऱ्यांना प्रति टन रु.५१/- प्रमाणे जास्तीचे बिल लवकरच शेतक-यांच्या खात्यावर जमा करणार आहे. अशा प्रकारे सन २०२२-२३ हंगामातील ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना रु.२३५१/- दर दिला असुन एफ. आर. पी पेक्षा रु.५४.५५ प्र.मेटनास जास्तीचा दर देण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे.
येणाऱ्या गळीत हंगामामध्येही इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला ऊस दर देणार आहे. स्व. मारवाडी वकील साहेब व स्व. रतनचंद शहा शेठजी यांनी हा शेतक-यांचा राजवाडा उभा केलेला आहे. हे संचालक मंडळही काटकसरीने कारभार करीत आहे. मागील हंगामातील ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले सर्व अदा केली आहेत. कामगारांचे पगारही महिन्याच्या दहा ताररखेच्या आत करीत आहोत.
कारखान्यातील कामगारांनीही कारखान्यासाठी चांगले काम करुन योगदान दिले आहे. त्यामुळे या दिपावलीसाठी कामगारांची दिपावली गोड व्हावी यासाठी दहा दिवसाच्या पगाराएवढा बोनस देणार आहे. माजी आमदार श्री प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन श्री भगिरथ भालके यांनी मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य केलेले आहे. चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने ४ लाख मे. टन गाळपाचे उदिष्ट ठेवलेले आहे. सभासद शेतक-यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतास देवून सहकार्य करावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
याप्रसंगी श्री लतिफ तांबोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे स्वागत प्र. कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी केले. याप्रसंगी व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौंडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे,
महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री अजित जगताप, माजी संचालक श्री भारत पाटील, बळवंतराव पाटील, जालिंदर व्हनुटगी तसेच शिवाजीराव नागणे, काशिनाथ पाटील, दत्ता कांबळे, प्रविण खवतोडे, रामा घोडके, इराण्णा पुजारी, नितीन पाटील, रामेश्वर मासाळ, काशिनाथ पाटील- आंधळगांव, संतोष सोनगे, एकनाथ फटे, रामलिंग कवचाळे, दौलत माने, विठ्ठल चौगुले, महादेव जाधव, सिध्दराम कोळी, कल्याण रोकडे,
हरीभाऊ यादव, पप्पू स्वामी, दत्ता चौगुले, तात्यासाहेब घोडके, मधुकर बेदरे, विभिषण बाबर, भारत सावंत, शुभम जगताप, भाऊसाहेब पाटील, तायाप्पा गरंडे, भारत सावंत, महंतेश पाटील, विठ्ठल चौगुले, रावसाहेब लिगाडे, हणमंत रोकडे, तात्या घोडके, विलास पाराध्ये, शिवाजी कांबळे, दत्ता भाकरे, शिवाजी माळी, महादेव माळी, साईनाथ ठेंगील, तानाजी रोकडे, विकास बेदरे, हरी पाटील, राजू कवनाळे, मच्छिंद्र मुंगसे, दत्ता गडदे, बंडू करे, चांगदेव लवटे,
दौलतसिंग रजपूत, मारुती शिंदे, रवी पुजारी, भाऊसाहेब बाबर, पांडूरंग बेदरे, विविध दैनिकांचे पत्रकार, सभासद शेतकरी, विविध गावचे विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संचालक गोपाळ भगरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज