mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांना कमी वेळेत लाभ गतिमान पद्धतीने देण्यासाठी “शासन आपल्या दारी” ही मोहीम; माजी आ.प्रशांतराव परिचारक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 2, 2023
in राजकारण, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

शासनाने जाहीर केलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची जबाबदारी असते, नागरिकांना कमी वेळेत एकाच छताखाली सर्व विभाग एकत्रं आणून योजनांचा लाभ गतिमान पद्धतीने देण्यासाठी

“शासन आपल्या दारी”ही मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांना कमी वेळेत विविध योजनांचा लाभ गतिमान करण्यासाठीचं “शासन आपल्या दारी मोहीम” असल्याचे मतं जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग तालुका पंढरपूर यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त सेवा पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन करकंब येथील वडार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे मा आ. प्रशांतराव परिचारक, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या उपस्थतीमध्ये पार पडला.

सुरुवातीस भारत मातेची प्रतिमा व कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, मा. जि. प.सदस्य बाळासाहेब देशमुख, भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग जिल्हा संयोजक प्रशांत सापनेकर, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत,रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार व्यवहारे, ग्रा.पं. सदस्य संतोष धोत्रे ,बापू शिंदे, बाळू हराळे ,सुनील मोहिते, मुस्तफा बागवान,

राजेंद्र करपे,प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष उमेश गोडसे ,शहराध्यक्ष महेंद्र लोंढे बजरंग दलाचे बाळासाहेब धोत्रे ,माऊली पवार, अक्षय धोत्रे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, संजय मोहिते, परमेश्वर धोत्रे, केरबा पवार, बंडू धोत्रे अनिल राखुंडे, विजय नलवडे औदुंबर कुंभार, अजित धतींगे, किरण काळे,

संतोष टकले, विजयमामा माळी, सलीम बागवान, अरुण बनकर, रामेश्वर खाडे ,सतीश खारे, अंकुश खारे लक्ष्मण व्यवहारे ,राजाराम कोरके दत्ता कदम, विकास घाटुळे, रामदास माने, बाळासाहेब गुळमे, संजय शेटे, जयंत टकले, मन्ना बागवान तसेच महसूल विभागातील अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,बहुसंख्य ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना परिचारक म्हणाले,नागरिकांना सरकारी योजना व कागदपत्रे एकाचं ठिकाणी उपलब्ध करून देणे हे “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचा उद्देश आहे. “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. नागरिकांना प्रत्येक योजनाचा पुरेपूर लाभ मिळावा. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आलेल्या नागरिकांना योजनांची माहिती द्यावी. त्यांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्याचे प्रयत्न करावेत. असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामीण विकासविभाग पंढरपूर तालुका संयोजक मनोज पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नववर्षाच्या कालखंडामध्येशेतकरी ,शेतमजूर, कामगार, महिला, व युवक आणि सर्वसामान्य वर्ग केंद्रबिंदू मानून केलेल्या विकास कामाच्या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भिमा व्यवहारे व आभार लक्ष्मण कुंभार सर यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शासन आपल्या दारी

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

September 1, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

लिफ्ट मागितल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर एकाचा अत्याचार; पोलिसांनी केले आरोपीस अटक, तीन दिवसाची पोलिस कोठडी

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा