mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिलासादायक! कर्जदारांनो बँक ‘या’ अशा प्रकारे व्याज आकारू शकत नाही; जाणून घ्या RBI चे नवे नियम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 13, 2023
in राज्य
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच देशातील कर्जदारांना दिलासा देणारी पावले उचलत बँका आणि एनबीएफसीच्या मनमानी कार्यपद्धतीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी नियमांमध्ये बदल करून कोट्यवधी कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकिंग व्यवस्थेचे नियमन करणारी केंद्रीकृत संस्था आहे. या मध्यवर्ती बँकेने बँका आणि एनबीएफसीला अलीकडेच दिलेल्या निर्देशांनुसार, कर्जदार वेळेवर कर्जाचा मासिक हप्ता भरू शकला नाही किंवा त्याचा ईएमआयचा चेक बाऊन्स झाला, तर त्याच्यावर बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो;

परंतु या दंडावर व्याज आकारले जाऊ शकत नाही. बँकेने म्हटले आहे की, देशातील अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी दंडात्मक व्याज हे आपले महसूल वाढवण्याचे साधन बनवले आहे. त्यामुळे कर्जदारांवरच्या खिशावरचा बोजा वाढत असून बँकांची तिजोरी भरत आहे.

याला चाप लावण्यासाठी आरबीआयने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बँका आणि एनबीएफसींना कर्जाच्या ईएमआयचा चेक बाऊन्स झाल्यानंतर आकारण्यात येणार्‍या दंडावर व्याज आकारता येणार नाही.

काय आहेत आरबीआयचे नवीन नियम

नवीन नियमांनुसार, कर्जाचा हप्ता भरण्यात दिरंगाई झाल्यास, बँका आता संबंधित ग्राहकावर फक्त ‘वाजवी’ दंडात्मक शुल्क आकारू शकतील. या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँका आणि इतर वित्तसंस्थांना जानेवारी 2024 पासून दंडात्मक व्याज आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही.

यासोबतच दंडात्मक शुल्कही अवाजवी नसावे, असे स्पष्टपणाने आरबीआयने म्हटले आहे. तसेच हे व्याज पक्षपाती नसावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे दंडात्मक शुल्काचे भांडवलीकरण होणार नाही, याची खबरदारी आता बँकांना घ्यावी लागणार आहे.

हे पाऊल कर्जदारांना दिलासा देणारे आहे. कारण, एकदा दंड आकारणी केल्यानंतर पुन्हा त्या रकमेवर व्याज आकारणे म्हणजे सावकारीच म्हटले पाहिजे; पण बँकांकडून हा अन्याय ग्राहकांवर सर्रास केला जातो.

गृह कर्जासारख्या कर्जात अनेक कर्जधारकांना तर याची कल्पनाही नसते. कारण, बँका हे व्याज एकूण रकमेत समाविष्ट करून मोकळ्या होतात. त्यामुळे ग्राहक याबाबत अनभिज्ञ राहतो. आता या सुलतानी व्याज पद्धतीवर आरबीआयने अंकुश आणला आहे.

कर्जाचा हप्ता बँका स्वतःहून वाढवू शकत नाही

याशिवाय आरबीआयने कर्ज घेणार्‍यांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. कोणत्याही बँका स्वतःहून कर्जाचा हप्ता वाढवू शकत नाहीत, असे केंद्रीय बँकेचे म्हणणे आहे. यासाठी त्यांना ग्राहकांची परवानगी घ्यावी लागणार आहे, तसेच ग्राहकांना फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवरून निश्चित दरांवर सहजपणे स्विच होता आले पाहिजे, असेही आरबीआयने बजावले आहे.

फ्लोटिंग रेट हा संपूर्णपणे बाजारातील स्थितीशी निगडित असतो. बाजारातील चढउतारानुसार दरातही बदल होत असतो, तर फिक्स्ड रेटस् हे कर्जाच्या पूर्ण कालावधीसाठी एकसमान असतात. अनेकदा असे दिसून आले आहे की, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून कर्जावरील व्याज दर वाढवले जातात. त्यानुसार अनेक बँका कर्जधारकांचा मासिक हप्ता वाढवतात.

ग्राहकांना त्याची योग्य माहितीही दिली जात नाही आणि त्यांची संमतीही घेतली जात नाही. साहजिकच यामुळे कर्जधारकांचे महिन्याचे अर्थकारण कोलमडते. कारण, देशातील कर्ज घेणार्‍यांपैकी बहुतांश कर्जदार हे मध्यमवर्गीय आणि हातावर पोट असणारे आहेत.

कर्जाचा हप्ता चुकल्यास त्यावर शे-पाचशे रुपये दंड आकारला जात असल्यामुळे दर महिन्याच्या निर्धारित तारखेला ईएमआयची रक्कम आपल्या बँक खात्यात ठेवण्याचा बहुतांश कर्जदार आटोकाट प्रयत्न करत असतात. अशा वेळी व्याज दरवाढीनंतर बँकेकडून एकाएकी हप्त्याची रक्कम वाढवली गेल्यास कर्जधारकांवरील भार वाढतो. पण, आता आरबीआयने यासाठी कर्जदारांची परवानगी घेण्याचे व त्यांना योग्य माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार निवडू शकतो फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा पर्याय

दुसरीकडे, सतत वाढत जाणार्‍या व्याज दराचा अंदाज घेऊन अनेक कर्जदार फिक्स इंटरेस्ट रेटचा पर्याय किफायतशीर ठरेल असा विचार करून त्यासाठी बँकेकडे विचारणा करतात, अर्ज करतात; पण बँका यासाठी कर्जदारांची अडवणूक करतात, त्यांना सहजासहजी स्थिर व्याज दराचा पर्याय निवडू देत नाहीत असे दिसून आले आहे.

विशेषतः आपण कोरोना काळातील स्थिती पाहिल्यास त्यावेळी रेपो दर अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याने बँकांच्या व्याज दरातही घसरण झाली होती. त्यावेळी अनेकांनी स्थिर कर्जासाठी बँकांकडे विचारणा केली असता बँकांकडून त्याबाबत टाळाटाळ करण्याची भूमिका घेण्यात आली. नंतरच्या काळात व्याजदरांनी उचल खाल्ली. साहजिकच तेव्हा या कर्जदारांनी फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा पर्याय निवडला असता, तर या वाढीव व्याजदरांमुळे वाढणारा बोजा त्यांच्यावर पडलाच नसता.

आता आरबीआयने एक अधिसूचना जारी करून बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ग्राहकांना व्याजदर नव्याने निश्चित करताना निश्चित व्याज दर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. यासाठी एक योग्य धोरण तयार करण्यास सांगितले आहे.

याखेरीज गृह कर्जासारखे दीर्घ मुदतीचे कर्ज घेणारे बहुतांश कर्जदार आपली आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर, हाताशी काही रक्कम साठल्यानंतर कर्जामध्ये ती भरून हप्त्याचा भार कमी करण्याचा किंवा खाते बंद करण्याचा विचार करतात; पण काही बँका यासाठीही नीटसे सहकार्य करत नाहीत, असे दिसून आले आहे.

आरबीआयने हा प्रश्नही विचारात घेऊन ग्राहकांना कर्जाची पूर्ण किंवा काही रक्कम वेळेपूर्वी देण्याची परवानगी बँकांनी दिली पाहिजे आणि त्यांना कर्जाच्या कालावधीत केव्हाही ही सुविधा मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. यामुळे कर्जदारांसाठी गृह कर्ज अथवा अन्य कर्जाचा भार आपल्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार कधीही कमी करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.(स्रोत: पुढारी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कर्जदारांना दिलासा

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्या; आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

November 13, 2025
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लग्नाळू! माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं ‘या’ बड्या नेत्याला पत्र

November 13, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

November 13, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.आवताडेंनी मोठा डाव टाकला; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंताला गळाला लावले, भाजपची ताकद वाढली

November 12, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलले; पूर्वी ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ तर आता ‘ही’ अशी असणार टॅगलाईन

November 10, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, समुद्रात शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; पालकांनी मुलांची काळजी घ्यावी; नेमकं काय घडलं?

November 9, 2025
नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

November 8, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा ‘या’ दिवशी घोषणा होणार

November 8, 2025
Next Post
भाजप खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातील कागदपत्रांची फेर चौकशी होणार; निकाल येईपर्यंत लोकसभेचा कालावधी संपू शकतो?

खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामींचा अर्ज फेटाळला; जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय

ताज्या बातम्या

मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘शांतीसागर इंण्डेन गॅस एजन्सी’मध्ये नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार; गॅस असणाऱ्यांनी केवायसी करा, अन्यथा सबसिडी मिळणार नाही; ‘ही’ आहे शेवटची तारीख

November 13, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

वडिलांना घराचा ताबा देऊन मुलांनी घर रिकामे करावे, वडिलोपार्जित जमिनीत उत्पन्नापैकी ५० टक्के वार्षिक हिस्सा वडिलांना द्या; आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

November 13, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

भाजपच्या प्रतिष्ठेची तर घड्याळ, धनुष्यबाण, काँग्रेस, तुतारी, ठाकरे सेनेच्या अस्तित्वाची लढाई; आ.आवताडेंना रोखण्यासाठी अखेर ‘समविचारी’ची स्थापना; जगताप वेट & वॉच?

November 13, 2025
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लग्नाळू! माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं ‘या’ बड्या नेत्याला पत्र

November 13, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळ! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले, सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

November 13, 2025
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय ‘या’ व्यक्तीला अटक

November 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा