मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील उद्या सकाळपासून अतिक्रमण काढण्यात येणार आहे. हे अतिक्रमण काढायला विरोध होत आहे. माजी नगरसेवक अजित जगताप यांनी याला विरोध दर्शविला असून यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेने शहरातील 400 ते 500 छोटे छोटे व्यवसाय धारकांचे अतिक्रमण काढणे बाबत प्रसिद्धीकरण केले आहे व उद्या शुक्रवार रोजी सर्व अतिक्रमणे काढणार आहेत.
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे सणासुदीचे दिवस आहेत अशा परिस्थितीत शहरातील बेरोजगार तरुण महिला यांनी छोटी छोटी फायनान्स कंपनी बँक व पतसंस्था यांचे कडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत.
रोज होणाऱ्या व्यवसायावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे अशा परिस्थितीत रस्त्यास रहदारीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करून शहरातील सर्व व्यावसायिकांचा संसार रस्त्यावर आणण्याचा नगर प्रशासनाने घाट घातला आहे.
नगरपरिषद प्रशासनाला विचारणा केली असता पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याबाबत कळविण्यात आले आहे असे उत्तर दिले जाते
वास्तविक पाहता नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याकरता पोलीस प्रशासनाकडून दैनंदिन सुरू असलेली कारवाई
तसेच पुढे सुरू ठेवून नागरिकास शिस्त लावावी व अतिक्रमण काढता गोरगरीब व्यवसाय धारकास न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रशासनाधिकारी यांच्याकडे केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज