टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या कृषी साहित्य योजनेच्या लाभासाठी अर्ज शुक्रवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक काल कृषी समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मुदतवाढ देण्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी अवजार, वाटपाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त व्यक्तींचा सहभाग असावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस प्रशासन विभागाच्या आहे.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, समितीचे सचिव म्हणून कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे उपस्थित होते.
विशेष घटक योजनेचे जिल्हा कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, मोहीम अधिकारी अशोक मोरे, सहा. प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज, समिती कार्यासन राजश्री कांगरे व जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी, विस्ताराधिकारी बैठकीत उपस्थित होते.
मिळालेल्या मुदतवाढीनूसार साहित्य जास्तीत जास्त इच्छुक व पात्र व्यक्तींनी २५ ऑगस्टपर्यंत पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्याचे आवाहन संदीप कोहिनकर यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज