mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरकरांच्या आशेवर पाणी,विमानतळ उभारण्याची योजना बारगळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरकरांच्या आशेवर पाणी,विमानतळ उभारण्याची योजना बारगळणार

टीम मंगळवेढा टाईम्स । कर्नाटकातील विजयपूर (पूर्वीचे विजापूर) येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास प्राधान्य देण्यात आल्याने सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव गुंडाळावा लागेल, अशीच चिन्हे आहेत. कारण सोलापूर आणि विजयपूर यांच्यात  ९० किमी अंतर असून, एवढय़ा कमी अंतरात दोन विमानतळ उभारले जाण्याची शक्यता कमीच दिसते.

सोलापूरपासून जवळच असलेल्या विजयपूरच्या नव्या विमानतळाच्या उभारणीला गती आली आहे. त्यासाठी तेथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. हाच निकष लावून सरकारने विमानतळाच्या उभारणीसाठी विजयपूरला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. तेथून १५ किलोमीटर अंतरावर मदभावी-बहाणपूर येथे ७२७ एकर क्षेत्रात नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. त्यासाठी यापूर्वीच जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली होती. या विमानतळाची उभारणीदेखील सोलापूरप्रमाणेच दहा वर्षे रखडली होती. 

परंतु अलीकडेच कर्नाटक सरकारने या विमानतळासाठी २२० कोटींचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ९६ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे विकासकामांची निविदा काढण्यात आली आहे. येत्या दीड वर्षांत विकासकामे पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या नव्या विमानतळामुळे उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील सोलापूर व सांगली भागास विमानसेवेचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. विशेषत: सोलापूर व सांगली जिल्ह्य़ातील द्राक्षे, डाळिंब, चिकू, केळी, बोर आदी फळांसह साखर, सोलापुरातील वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होण्यास चालना मिळणार आहे.

दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये किमान १५० किमी अंतर असावे, असा आपल्याकडे नियम आहे. सोलापूर आणि विजापूरमध्ये ९० किमी अंतर आहे.

बोरामणी येथील विमानतळाचे काम रखडले

सोलापुरात होटगी रस्त्यावर छोटे विमानतळ कार्यरत आहे. याचा वापर करीत यापूर्वी २००८ साली सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने खासगी कंपनीच्या माध्यमातून मुंबईची विमानसेवा सुरू होती. त्यास सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. परंतु नंतर अचानकपणे ही सेवा स्थगित झाली आणि पुढे कायमची बंद पडली. सोलापुरात दुसरे वजनदार नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या जुन्या आणि छोटय़ा आकाराच्या विमानतळाचा विचार बाजूला ठेवून भविष्यकाळाचा वेध घेत, सोलापूरपासून १७ किलोमीटर अंतरावर बोरामणी येथे नवे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातूनच काही दिवसांतच मंजुरीही मिळाली होती. सुशीलकुमार शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून राजकीय वजन वापरल्यामुळे बोरामणी विमानतळासाठी लागणाऱ्या १३७५ हेक्टर जमिनीचे संपादन झाले. त्यानंतर नियोजित विमानतळाच्या सभोवताली संरक्षण कुंपणही उभारण्यात आले. 

दरम्यान, आणखी २८ हेक्टर जमिनीची कमतरता पडली आणि संपादित करावयाची संबंधित जमीन वनविभागाची असल्यामुळे ती प्रक्रिया मंत्रालयात प्रलंबित राहिली. तथापि, २०१४ साली देशात मोदी सरकार सत्तेवर आले आणि सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांची मोठी राजकीय पीछेहाट झाली असताना सोलापूरच्या नव्या विमानतळाचा प्रश्न रखडला.  राज्यातील यापूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने सोलापूरच्या बोरामणी विमानतळासाठी एक छदामही दिला नव्हता.

फडणवीस सरकार गेल्यानंतर विद्यमान महाविकास आघाडी सरकारच्या काळात या विमानतळासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुन्हा सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी हालचाली केल्या. त्यानुसार गेल्या फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बैठकीत ५० कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे विमानतळाच्या रखडलेल्या उभारणीला काही प्रमाणात का होईना, चालना मिळण्याची आशा निर्माण झाली होती.

कर्नाटक सरकारने विजयपुरात नव्या विमानतळासाठी ९५ कोटींचा निधी वितरित करून प्रत्यक्ष उभारणी कामाला चालना दिली आहे. तर दुसरीकडे सोलापूरचे गेली १२ वर्षे रखडत पडलेल्या बोरामणीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची एक वीटसुद्धा चढली नाही. त्या मागून विजयपूरचे नवे विमानतळ उभारण्याचे जोमाने सुरू झाल्यामुळे सोलापूरचे विमानतळाचे भवितव्यच अनिश्चिततेच्या गर्तेत आहे.

उडान योजना हवेतच

सोलापूरच्या जुन्या विमानतळावरून मुंबई विमानसेवा सुरू करण्याची घोषणा मोदी सरकारने तीन वर्षांपूर्वी केली होती. त्यासाठी ‘उडान’ योजनेचा आधार होता. सोलापूरप्रमाणे नांदेड व अन्य तीन शहरांसाठी उडान योजना मंजूर झाली होती. उडान योजनेच्या घोषणेनंतर अगदी दुसऱ्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबर २०१७ मध्ये सोलापूरची विमानसेवा सुरू होणार असल्याचा गाजावाजाही करण्यात आला होता. प्रत्यक्षात उडान योजना सोलापूरकरांसाठी हवेतच राहिली आहे. जुन्या विमानतळाला खेटून असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उंच चिमणीचा अडथळा विमानसेवेला होणार असल्याचे कारण पुढे आले. साखर कारखान्याच्या चिमणीच्या वादावर अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत शासनाच्या बाजूने निकाल लागला. मात्र तरीही प्रशासनाने कारखान्याची चिमणी पाडली नाही. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकारच्या उडान योजनेचा लाभ सोलापूरकरांना मिळाला नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
परतफेड करूनही वसुली करणाऱ्या सोलापूर सावकारावर गुन्हा

परतफेड करूनही वसुली करणाऱ्या सोलापूर सावकारावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 16, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा