टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून आज पुन्हा 8 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 131 वर गेली आहे.
आज दि.3 ऑगस्ट रोजी 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 8 पॉझिटिव्ह आले तर 32 निगेटिव्ह आलेले आहेत.
आज आलेले 8 पॉझिटिव्ह रुग्ण हे 7 मरवडे येथे तर 1 मंगळवेढा शहरात आढळून आलेले आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 131
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 52 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 78 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज