mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रक्षकच भक्षक! पाण्याच्या हौदात विष टाकल्याप्रकरणी त्या फरारी पोलिस पाटीलाला मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 13, 2023
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

मंगळवेढा तालुक्यातील डिकसळ येथील पाणी पुरवठा करणार्‍या हौदामध्ये विषारी औषध टाकल्याप्रकरणी गावचा पोलिस पाटील तथा आरोपी तुकाराम भैरू कांबळे याला पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकिकत अशी, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी पुरवठा करण्यासाठी 8 हजार लिटर क्षमतेची टाकी असून या टाकीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे.दि.3 जुलै रोजी सकाळी 9.00 वा. पाणी शुध्दीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई विशाल मागाडे हा तेथे गेल्यावर पाण्याची दुर्गंधी आल्याने संशय निर्माण झाला.

याबाबत चौकशी केली असता हौदाच्या काही अंतरावर जनावराचे गोचीड मारण्याची औषधाची रिकामी बाटली पडल्याचे निदर्शनास आले. तसेच टाकीच्या पृष्ठभागावर औषधाचे डागही दिसून येत होते.दरम्यान याची फिर्याद ग्रामसेवक राहुल कांबळे यांनी दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.

घटनेनंतर गावचा पोलिस पाटील तथा आरोपी तुकाराम कांबळे हा मोबाईल बंद करून फरार झाल्याने शंका कुशंका निर्माण होवून चर्चेला उधाण आले होते. प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी गावाला भेट देवून

याबाबतची सखोल माहिती जाणून घेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सहाय्यक फौजदार सलीम शेख व पोलिस नाईक सुरज देशमुख यांनी मोबाईल लोकेशनवरून त्याचा थांगपत्ता काढून कवठेमहांकाळ जि.सांगली येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

कवठेमहांकाळ येथे तो एका टेलरकडे काम करीत असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले असून त्याने विष टाकल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. हे औषध मरवडे येथील एका दुकानातून खरेदी केल्याने पोलिसांनी तेथे जावून त्याची शहनिशा केली.

तसेच तेथील फुटेज मिळवून पाहिले असता तो त्यामध्ये दिसून आल्याने त्यानेच विष टाकले असल्याचा अंदाज बांधून त्या दिशेने तपास सुरु केला. औषध टाकण्याची घटना का केली याबाबत पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे सांगण्यात आले.

घटना घडल्यानंतरही आरोपीचा शोध लागत नसल्याने गावभेट दौर्‍यात डिकसळ ग्रामस्थांनी याबाबत आमदार समाधान आवताडे यांच्याकडे गार्‍हाणे मांडून आंदोलन करण्याचा इशारा देताच पोलिस खाते वेगाने कामाला लागून तात्काळ आरोपीला शोधून काढले.

काही ग्रामस्थांनी विषारी पाणी पिल्याने त्यांना भविष्यात धोका होवू नये या दृष्टीने आरोग्य विभागाने तात्काळ त्यांचेवर उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला तसेच पोलिस प्रशासनाने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून संपूर्ण गावाला ते पाणी पिवू नये असे आवाहन केले होते.

दरम्यान, गावच्या पोलिस पाटलावर गावातील कायदा व सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी असताना त्याने विष कुठल्या उद्देशाने टाकले या मागचे गुपित उघड करणे पोलिसांना एक आव्हान आहे. सध्या तो या मुद्दयावर काहीच बोलत नसल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस कोठडीमंगळवेढा

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

​अजब चोरी! मंगळवेढ्यात बँकेची तिजोरी सोडून चोरट्यांनी ‘भंगारा’वर मारला डल्ला; ‘हे’ साहित्य पळवून पोलिसांना दिले खुले आव्हान

April 9, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

तांडोर-सिद्धपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; १० लाखांच्या भव्य अभ्यासिकेचे आज आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून भूमिपूजन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा

April 9, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

धार्मिक मार्गावर मांस विक्रीचा हैदोस; आक्रमक झालेल्या महिला मोर्चाचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; संतांच्या भूमीचा अपमान खपवून घेणार नाही

April 8, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात १४ वर्षांच्या बालिकेचा बेकायदेशीर विवाह; सासरच्या जाचाला कंटाळून चिमुरडीची आत्महत्या; जन्मदात्या आई-वडिलांसह पती, सासू-सासाऱ्यांवर गुन्हा दाखल

April 8, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

April 6, 2026
Next Post
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात येणार? जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना

ताज्या बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

​अजब चोरी! मंगळवेढ्यात बँकेची तिजोरी सोडून चोरट्यांनी ‘भंगारा’वर मारला डल्ला; ‘हे’ साहित्य पळवून पोलिसांना दिले खुले आव्हान

April 9, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

तांडोर-सिद्धपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; १० लाखांच्या भव्य अभ्यासिकेचे आज आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून भूमिपूजन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा

April 9, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

धार्मिक मार्गावर मांस विक्रीचा हैदोस; आक्रमक झालेल्या महिला मोर्चाचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; संतांच्या भूमीचा अपमान खपवून घेणार नाही

April 8, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात १४ वर्षांच्या बालिकेचा बेकायदेशीर विवाह; सासरच्या जाचाला कंटाळून चिमुरडीची आत्महत्या; जन्मदात्या आई-वडिलांसह पती, सासू-सासाऱ्यांवर गुन्हा दाखल

April 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..