मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव ते तनाळी रस्त्यावर माण नदीच्या पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याची अद्याप ओळख पटली नाही.
मृतदेह सोमवारी आढळला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत माहिती अशी, गुंजेगाव-तनाळी रस्त्यावर उजनी कॅनॉलच्या पुलाखाली
एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती गुंजेगावचे पोलिस पाटील यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी सदर ठिकाणी ५० ते ५५ वर्षे अंदाजे वय असणारे, गोल चेहरा, बसके नाक, डोक्यावर काळे पांढरे केस, मध्यम मिशी,
अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर बारीक निळ्या रंगाचे ठिपके असलेला शर्ट असलेला अनोळखी मृतदेह आढळला. तपास पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज