mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर व मंगळवेढ्यात शेकडो कोटींची कामे; राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना; आमदार समाधान आवताडे यांनी मांडला केलेल्या कामाचा लेखाजोखा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2023
in मंगळवेढा
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघात शेकडो कोटी रूपयांचा निधी आला असून यातून अनेक कामे मार्गी लागत आहेत. याचवरोवर मागील नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चौफेर विकास होत असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने केलेल्या कामांची व योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी केंद्रीय स्तरावरून रावविण्यात आलेल्या योजनांची माहिती देत मतदारसंघातील कामांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हजारो कोटी रूपये खर्च करून पंढरपूरला जोडणारे सर्व रस्ते महामार्ग दर्जाचे तयार केले आहेत.

केंद्राच्या नगरपरिषदेसह विविध विभागांसाठी असणाऱ्या योजनांतून कोट्यवधी रूपयांचा निधी मिळाला आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून नऊशे कोटी रूपयांहून अधिकची कामे होत आहेत.

राज्य सरकारने पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालय शंभरवरून दोनशे खाटांचे करण्यासाठी तेरा कोटी रूपयांचा निधी दिला आहे.

तसेच पंढरपूरमध्ये एमआयडीसी स्थापन करण्यास उच्चाधिकारी समितीची मान्यता मिळाली असून आता लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे. नामसंकीर्तन सभागृहाला वीस कोटी रूपये देण्यात आले आहेत. पंढरपूरचे यात्रा अनुदान दहा कोटी रूपये इतके वाढविण्यात आले आहे.

पंढरपूर शहरातील नवीन पाणी योजनेसाठी ११० कोटी रूपयांच्या योजनेला मान्यता मिळत असून ड्रेनेजसाठीही नवीन १०५ कोटी रूपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रूपयांची योजना तयार करण्यात आली आहे.

वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या कामासाठी दीडशे कोटी रूपयांचे काम मंजूर असून सरगम चौक ते शहरात येणाऱ्या उड्डाणपुलाचे ऑनलाइन भूमिपूजन कालच पार पडले असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.

मंगळवेढ्यातील चोवीस गावांच्या उपसासिंचन योजनेला तांत्रिक मंजुऱ्या मिळाल्या असून लवकरच याचे काम ही सुरू होईल. याचवरोवर म्हैसाळ योजनेत समाविष्ट गावांच्या योजनेसही निधी मिळत आहे.

पंढरपूर व मंगळवेढा भागात विविध विभागांतील कामांना राज्य सरकार निधी देत आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या सुशोभिकरणाचा ७३ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याचे आवताडे यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

मंगळवेढ्यातील 'या: कालव्याच्या पुलाखाली आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांनी केले आवाहन...

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..