mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिर्के मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 29, 2023
in आरोग्य, मंगळवेढा
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू झाली आहे.

आता नागरीकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती संचालक डॉ. शरद शिर्के यांनी दिली आहे.

केसरी व पिवळे रेशनकार्ड असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिलांच्या विविध आजारांवर ऑपरेशनची सोय उपलब्ध असून बालरोग विभाग, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र,

ऑर्थोपेडिक अँड ट्रामा विभाग, मेडिसिन विभाग , अस्थिरोग विभाग, सोनोग्राफी व एक्स-रे विभाग त्वचारोग विभाग आदी सर्व सुविधा आता एकाच छताखाली मिळणार आहेत.

दरम्यान, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पिवळे व केसरी कार्ड यांच्याकडे आहे त्या फॅमिली मधील किंवा कुटुंबीयांमधील हाडाचे फॅक्चर झाले तर संपूर्ण उपचार मोफत आहेत लहान मुलांसाठी फोटोथेरेपी तसेच काचेत बाळ ठेवणे संपूर्ण मोफत आहे.

याकामी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, आ.समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याची माहिती संचालक डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील गरजू  व तळागाळातील लोकांना दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित स्वरूपात गेल्या ४ वर्षांपासून राबविण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. ५ लक्ष पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. १ लक्ष ५० हजार पर्यंतचे व मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रु. २ लक्ष ५० हजार पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका/ फोटो ओळखपत्र व आयुष्मान कार्ड (PMJAY साठी) ची आवश्यकता आहे.

आपणास या योजनेमध्ये उपचारपूर्व तपासण्या, वैद्यकीय उपचार, प्रत्यारोपण साहित्य, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, जेवण हे निःशुल्क उपलब्ध आहेत. उपचारानंतर परतीचा प्रवास खर्च योजनेअंतर्गत दिला जातो. या योजनांतर्गत हृदय शस्त्रक्रिया, मूत्राशयाचे आजार, हाडाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, कॅन्सर अशा १८३ उपचारांसाठी पाठपुरावा सेवादेखील मोफत दिली जाते.

सदर योजनेच्या योग्य व प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच . आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत हे वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन व प्रोत्साहित करीत असतात.

योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा केंद्राच्या १५५३८८/१८००२३३२२०० किंवा १४५५५/१८००१११५६५ या क्रमांकावर निःशुल्क संपर्क साधावा तसेच www.jeevandayee.gov.in व www.pmjay.gov.in या वेबसाईट वर भेट द्या.  आपणास व आपल्या कुटुंबियांस उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. -डॉ.शरद शिर्के

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ. शरद शिर्के

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी तळ गाठणार! उजनीतील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर; धरणातून साडेदहा हजार क्युसेकने सोडले पाणी

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा